India vs Pakistan | टी-20 नंतर भारत आणि पाकिस्तान पुन्हा क्रिकेटच्या मैदानात ‘आमने-सामने’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – India vs Pakistan | मागील दोन ते तीन वर्ष झाली भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांचा क्रिकेट सामना पाहावयास मिळाला नाही. नुकतंच टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T-20 World Cup) भारत विरुद्ध पाकिस्तान हे प्रथमच आमने-सामने आल्याने अनेक प्नेमींना मॅच बघण्यात उत्सुकता निर्माण झाली होती. यानंतर आता आगामी वर्षी हे दोन्ही देशाचे क्रिकेट संघ आमने-सामने येणार आहेत.

 

कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये (Birmingham 2022 Commonwealth Games) महिला क्रिकेट टीममध्ये ही मॅच होणार आहे. यासाठी भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला क्रिकेटचा (Women’s cricket team) प्रथमच समावेश केला गेला आहे. या आगोदर 1998 मध्ये मलेशियात झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत पुरूषांच्या क्रिकेटचा समावेश केला होता. आता महिलांना संधी देण्यात आलीय. मेडल जिंकण्यासाठी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यात परस्पर भिडणार आहेत.

 

‘कॉमनवेल्थ गेम्समधील महिला क्रिकेटची सुरूवात 29 जुलै रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) या मॅचनं होणार आहे. 7 ऑगस्टपर्यंत क्रिकेटचे सामने होतील. भारत संघ ऑस्ट्रेलियानंतर बार्बोडस आणि पाकिस्तान विरुद्ध सामना खेळणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील मॅच 31 जुलै रोजी होणार आहे. तर टीम इंडियाचा ग्रुपमधील शेवटची मॅच 3 ऑगस्ट रोजी बार्बाडोस विरुद्ध होईल. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान मॅच देखील त्याच दिवशी होणार आहे. यजमान इंग्लंडची पहिली मॅच 30 जुलै रोजी पात्रता फेरीतून पुढे आलेल्या संघाविरुद्ध होणार असल्याचं इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ECB) अधिकाऱ्याने सांगितलं आहे. तसेच 6 ऑगस्ट रोजी सेमी फायनल तर 7 ऑगस्ट रोजी मेडलसाठी सामना होणार आहे.

 

कॉमनवेल्थ स्पर्धेत 8 देश असणार – (महिला संघ)

ग्रुप A –

– भारत

– पाकिस्तान

– ऑस्ट्रेलिया

– बार्बाडोस

ग्रुप B –

– इंग्लंड

– न्यूझीलंड

– दक्षिण आफ्रिका

– पात्रता फेरीतील विजेता संघ

 

Web Title :- India vs Pakistan | commonwealth games 2022 india and pakistan womens cricket team face each other

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा