#Video : ICC Word Cup 2019 : ‘Gully Boy’ रणवीर सिंगची ‘भारत-पाक’ क्रिकेट सामन्यावर कॉमेंट्री

मँचेस्टर : वृत्तसंस्था – विश्वचषकात भारत पाकिस्तानचा सामना चर्चेत आहे. सुवातीलाच नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या समान्यासाठी सगळीकडून भारतीय संघासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर क्रिकेट आणि बॉलिवुडचं नात सर्वश्रुत आहे. त्यात भारत पाकिस्ताच्या सामन्यात चाहत्यांसाठी अजुन एक सुखद धक्का मिळाला आहे. या सामन्यासाठी खुद्द बॉलिवुड स्टार रणवीर सिंगने हजेरी लावली आहे. त्याने फक्त सामना पाहण्यासाठी आलेला नाही तर तो चक्क कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसत आहे. रणवीर BCCI साठी भन्नाट कॉमेंट्री करताना दिसत आहे.

रणवीर सिंग सध्या त्याच्या आगामी चित्रपट ८३ च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. तरीही त्याला हा सामना पाहण्याचा मोह आवरला नाही आणि तो थेट या सामन्याला पोहचला आहे. हा सामाना सुरू होण्याआधी रणवीरनं BCCI साठी कॉमेंट्री सुद्धा केली हा व्हिडिओ BCCI नं त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. तसंच रणवीर भारतीय संघाला चिअरअपही करताना दिसला.

तसंच हा सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी मैदानावर तुडूंब गर्दी केली आहे. भारत-पाक सामना हा भारतीय चाहत्यांसाठी उत्साही आणि मानाचा विषय असतो, हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे या सामन्याना चांहत्यांप्रमाणे बॉलिवुडचा नवाब अभिनेता सैफ अली खाननेही उपस्थिती लावली आहे. त्यासह अनेक कलाकारांनीही या सामन्याला उपस्थिती लावली आहे.

दरम्यान, १९८३मध्ये भारताला पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकून आणला होता. तो भारतीय क्रिकेटचा ऐतिहासिक क्षण होता. यावर रणवीरचा ८३ चित्रपट आधारित आहे. रणवीर सिंग या सिनेमामध्ये माजी क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. त्यामुळे क्रिकेटबद्दल रणवीरला चांगली समज आहे. त्यामुळे रणवीरच्या अभिनयासारखी त्याची कॉमेंट्रीही त्याच्या चाहत्यांना आवडत आहे.