‘हिटमॅन’ रोहित आणि मयांक अग्रवालनं बनवला वर्ल्ड रेकॉर्ड, 2 भारतीय दिग्गजांचा 11 वर्षापुर्वीचा मोडला ‘रेकॉर्ड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि मयांक अगरवाल यांनी राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांचा 11 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला आहे. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 317 धावांची भागीदारी करत भारताच्या वतीने कोणत्याही विकेटसाठी सर्वाधिक भागीदारी करण्याचा विक्रम देखील केला आहे.

या दोघांनी 269 धावा करताच वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांचा आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या विकेटसाठी केलेला 268 धावांचा विक्रम मोडला. त्याखालोखाल महेंद्रसिंह धोनी आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्यात सातव्या विकेटसाठी 259 धावांची भागीदारी झाली होती. त्यानंतर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यात 249 धावांची भागीदारी झाली होती. सर्वात मोठा भागीदारीचा विक्रम हा आफ्रिकेच्या हाशिम आमला आणि जॅक कॅलिस यांच्या नावावर असून त्यांनी 340 धावांची भागीदारी तिसऱ्या विकेटसाठी केली होती.

दरम्यान, आफ्रिकेविरुद्ध सर्वात जास्त सलामीला धावसंख्या बनवण्याचा रेकॉर्ड देखील रोहित आणि मयांक यांनी मोडला आहे. त्यांनी गॅरी कर्स्टन आणि अ‍ॅंड्रयू हडसन यांच्यात झालेल्या 236 धावांच्या भागीदारीचा रेकॉर्ड मोडला.

Visit : Policenama.com