ICC World cup २०१९ ; भारताची विजयी घौडदौड कायम, वेस्टइंडीजवर १२५ धावांनी विजय

मँचेस्टर : वृत्तसंस्था – आयसीसी वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध वेस्टइंडीज सामन्यात भारताने शानदार विजय मिळाला आहे. भारताने दिलेले २६९ धावांचे आव्हानाचा सामना करताना वेस्टइंडीजला केवळ १४३ धावा करता आल्या. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह यांच्या वेगवान माऱ्यापुढे वेस्टइंडीजच्या फलंदाजांनी सुरवातीपासून नांगी टाकली. भारताने प्रथम फलंदाजी करताना २६८ धावा बनवल्या होत्या.

कर्णधार विराट कोहलीने ७२ धावांची शानदार खेळी करून आंतरराष्ट्रीय स्तरावर २०,००० धावा पूर्ण केल्या. आतापर्यंत झालेल्या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत भारताचा एकदाही पराभव झालेला नाही. भारताने सलग पाचवा विजय मिळवून सेमीफायनल सामन्यावरील दावा अजून मजबूत केला आहे. भुवनेश्वर कुमारच्या जागी मोहम्मद शमीला खेळवण्याचा निर्णयही योग्य ठरला आहे.

वेस्टइंडीजचा धोकादायक फलंदाज ख्रिस गेलला मोहम्मद शमीने बाद केले. गुणतालिकेत तिसऱ्या नंबरवर असलेला भारत आता दुसऱ्या क्रमांकावर जाईल. वेस्टइंडीज संघ वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. भारताचा पुढील सामना इंग्लंडविरुद्ध ३० जून रोजी खेळला जाईल.

आरोग्यविषयक वृत्त 

या ‘शॉर्टटर्म’ व्यायाम प्रकारांचे अनुभवा ‘लॉंगटर्म’ फायदे

गर्भनिरोधक गोळ्यांचा होऊ शकतो ‘सेक्स लाईफ’वर परिणाम

जाणून घ्या ‘लिंबाचे’ औषधी गुणधर्म

‘या’ मेकअप टिप्समुळे तुम्ही सावळे असाल तरीही दिसाल सुंदर

‘या’ गोष्टी फॉलो करा आणि निकालाचे नैराश्य घालवा