‘बालाकोट’ एअर स्ट्राइक करणाऱ्या 5 वायूसेनेच्या वैमानिकांना ‘वायुसेना पदक’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बालाकोट मध्ये एअर स्ट्राइकचे हिरो विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना वायु सेनेकडून वीरचक्र देण्यात येणार आहेत. स्वातंत्र्यदिनी दिवशी त्यांना हे पदक देण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनी या पाच वैमानिकांना अमित रंजन, स्क्वॉर्डन लीडर राहूल बसोया, पंकज भुजडे, बीकेएन रेड्डीस, शशांक सिंह वायू सेनेकडून वीरता सन्मान देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हे सर्व वैमानिक मिरज फायटर २००० चे वैमानिक आहेत.

या शिवाय बालाकोटमध्ये दहशतवादी संघटनाचे तळ नेस्तानाबूत करण्याऱ्या भारतीय वायु सेनेचे स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवा यांना देखील युद्ध सेवा पदक देऊन सन्मानित करण्यात येईल. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला.

अभिनंदन ने २७ फेब्रुवारीला मिग-२१ बिसनने पाकिस्तानच्या एफ-१६ विमानांचा पाठलाग करून एक विमान पाडले होते. त्यानंतर दुसऱ्या एका विमानाने सोडलेले मिसाईल लागल्यामुळे कमांडरला हवेतच विमान सोडून द्यावे लागले होते आणि पाकिस्तानच्या हद्दीत उतरावे लागले होते. यानंतर भारताच्या दबावामुळे पाकिस्तानला अभिनंदन वर्थमान यांना सोडून द्यावे लागले होते. पाकिस्तानच्या सैनिकांनी अभिनंदनला अटक केली होती मात्र ६० तासाच्या आत अभिनंदनला वाघा बॉर्डर वरून पाकिस्तानने भारताच्या स्वाधीन केले. वीर चक्र हा भारतात युद्धामध्ये दिला जाणारा तिसरा सर्वोच्च सम्मान आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like