काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले

श्रीनगर : वृत्तसंस्था – भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर केलेल्या अभिमानास्पद कारवाईनंतर भारताचं एक मिग-२१ विमान सकाळी जम्मू काश्मीरमधील बडगाम येथे कोसळले. यात वैमानिकाचा मृत्यू झाला. युद्ध सरावादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. हवाई दलाकडून यासंदर्भात याची माहिती देण्यात आली. नेमकी काय बिघाड झाली याची माहिती अद्याप समोर आली नाही.

भारतीय हवाई दलाकडून काल पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळांचा खात्मा केला. त्यानंतर भारतात युद्ध सदृश्य परिस्थिती आहे. श्रीनगर येथून भारतीय हवाई दलाचे मिग २१ लढाऊ विमानाने सकाळी उड्डाण केले. त्यानंतर काही वेळातच बडगाम जिल्ह्यात आल्यावर त्यात काही तांत्रिक बिघाड झाल्याने ते कोसळले. हा अपघात असून तांत्रिक बिघाड झाल्याने झाला आहे. ते कोणत्याही कामगिरीवर निघालेले नव्हते. परंतु यात वैमानिकाचा मृ्त्यू झाला असल्याचे हवाई दलाकडून सांगण्यात आले आहे. परंतु नेमकी तात्रिक बिघाड काय झाली यासंदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही. 

धक्कादायक… #AirStrike नंतर भारतीय वायुदलाच्या ‘त्या’ विंग कमांडरची आत्महत्या