बेपत्ता एएन ३२ विमानाचे अवशेष सापडले ; विमानातील १३ जाणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय हवाई दलाचे बेपत्ता झालेल्या एएन ३२ विमानाचे अवशेष सापडले आहेत. हे विमान सोमवारी दुपारी एकच्या सुमारास बेपत्ता झाले होते. या विमानाचा शोध घेण्यात हवाईल दलाला यश आले आहे. मात्र, या विमानातील ५ प्रवासी आणि ८ कर्मचऱ्यांचा मृत्यू झाला. विमानाचे २९ वर्षीय पायलट आशीष तंवर यांना यामध्ये विरमण आले असल्याची अधिकृत माहिती आहे.

आसामच्या जोरहाट येथून उड्डाण केलेले हवाई दलाचे विमान अरूणाचलकडे जात होते. त्यावेळी विमानात १३ जण होते. १२ वाजून २५ मिनीटांनी विमानाने अरुणाचलच्या दिशेने उड्डाण केले. मात्र एकच्यासुमारास विमानाचा संपर्क तुटला. यानंतर विमानाचा शोध सुरु केला. विमानाचा शोध घेण्यासाठी हवाई दलाने सुखोई-३० आणि सी १३० या विमानांची मदत घेतली. बेपत्ता विमानाचा शोध घेत असताना विमानाचे पायुम नावाच्या गावाजवळ अवशेष दिसल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलीसनामावरील ताज्या बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन पोलीसनामाचे फेसबुक पेज आत्ताच लाईक करा.

विमान बेपत्ता झाल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सतत हवाई दलाच्या संपर्कात होते. बेपत्ता झालेले विमान रशियन बनावटीचे अँटोनोव एएन ३२ जातीचे होते. यापूर्वी अशा विमानांना अपघात झाले आहे. अरुणाचल प्रदेशकडे उड्डाण केल्यानंतर विमानाचे काहीवेळातच नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. यानंतर लगेच हवाई दलाने विमानाचा शोध सुरु केला. यासाठी लष्कराचे जवान आणि इंडो-तिबेट बॉर्डर फोर्सच्या पोलिसांची मदत घेण्यात आली.