भारतीय लष्कराचं ‘चित्ता’ हेलिकॉप्टर जम्मू-काश्मीरमध्ये ‘क्रॅश’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याचे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना घडली. जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यामध्ये भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर क्रॅश झाले.

सैन्याचे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची ही घटना जम्मूच्या रियासी जिल्ह्यातमध्ये रुद नाला जवळ सकाळी 11.15 वाजताच्या दरम्यान घडली. वीजेच्या तारांमध्ये अडकल्याने हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचे सांगितले जाते. माहितीनुसार या हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलट सुरक्षित आहेत.

याआधी देखील भूतानमध्ये भारतीय सैन्याचे असेच एक हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. या अपघातात दोन पायलट शहीद झाले होते. शहीद पायलटमध्ये एक भारतीय सैन्याचा पायलट होता तर दुसरा पायलट भूतान सैन्याचा होता. भारतीय सैन्यासह त्यांचे प्रशिक्षण सुरु होते.