विराट कोहलीसाठी अत्यंत दुःखद बातमी, जवळच्या ‘मित्रा’चा मृत्यू

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – जागतिक क्रीडा क्षेत्र सध्या कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली देखील लॉकडाऊनमूळ आपली पत्नी अनुष्का शर्मा सोबत मुंबईतील घरातच कैद आहे. पण सध्या विराट कोहली दुःखात आहे, ते त्याच्या खास मित्राच्या जाण्यामुळं. विराट कोहलीचा पेट डॉग ब्रूनोचे निधन झालं आहे. कोहलीनं सोशल मीडियात एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. विराट ब्रूनोला नेहमी आपला जवळचा मित्र मानत असे.

अचानक झालेल्या ब्रूनोच्या मृत्यूमुळे विराटला जबदस्त झटका बसलाय. नेहमीच विराट आपल्या सोशल माध्यमात ब्रूनोसोबतचे फोटो शेअर करत असतो. आता मात्र विराटनं ब्रूनोचा फोटो शेअर करत भावुक करणारा कॅप्शन लिहला आहे.

विराटनं ब्रूनोचा फोटो शेअर करतं, “तुझ्या आत्मास शांती लाभो. तू गेली ११ वर्ष आमच्यासोबत होता. तुझ्यासोबत माझं आयुष्यभराचं नातं होत. आज तू एका आनंदी आणि चांगल्या जागी असशील, अशी आशा करतो,” अशी पोस्ट लिहली आहे.

दरम्यान, कोरोना संसर्गामुळे सध्या सर्व क्रिकेट सामने रद्द करण्यात आले आहे. भारतीय प्रीमियर लीग २०२० तसंच टोकियो ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्यात. तसंच ऑक्टोबर मध्ये ऑस्ट्रोलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपवर देखील कोरोनाचे ढग गडद होत चालले आहे.