टीम इंडिया जानेवारी 2020 मध्ये खेळणार 10 सामने, जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन : नुकतीच भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे आणि ट्वेन्टी-२० मालिका संपन्न झाली. विशेष म्हणजे भारताने आपल्या चांगल्या खेळीच्या जोरावर या दोन्ही मालिकेत विजय मिळवला आहे. आता उत्सुकता आहे ती जानेवारी महिन्यात पार पडणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यांची. भारतीय संघ जानेवारी महिन्यात १० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. हे सामने नेमके कधी खेळवले जातील, याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता असून त्या सामन्यांचे वेळापत्रक आपण जाणून घेऊ.

जानेवारीमध्ये भारत पहिल्यांदा श्रीलंकेबरोबर तीन ट्वेन्टी-२० मालिका खेळणार असून त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चार ट्वेन्टी-२० सामने खेळवण्यात येणार आहेत.

टीम इंडियाचे जानेवारी २०२० चे वेळापत्रक:

५ जानेवारी, भारत विरुद्ध श्रीलंका, पहिला टी२० सामना (गुवाहाटी)

७ जानेवारी, भारत विरुद्ध श्रीलंका, दूसरा टी२० सामना (इंदूर)

९ जानेवारी, भारत विरुद्ध श्रीलंका, तिसरा टी२० सामना (पुणे)

१४ जानेवरी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पहिला वनडे सामना (मुंबई)

१७ जानेवारी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुसरा वनडे सामना (राजकोट)

१९ जानेवारी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तिसरा वनडे सामना (बंगळुरू)

२४ जानेवारी, भारत विरुद्ध न्यूझीलंड, पहिला टी२० सामना (ऑकलंड)

२६ जानेवारी, भारत विरुद्ध न्यूझीलंड, दूसरा टी२० सामना (ऑकलंड)

२९ जानेवारी, भारत विरुद्ध न्यूझीलंड, तिसरा टी२० सामना (ऑकलंड)

३१ जानेवारी, भारत विरुद्ध न्यूझीलंड, चौथा टी२० सामना (ऑकलंड).

श्रीलंकेविरुद्धच्या तीन ट्वेंटी-२० आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ३ वन डे सामन्यांसाठी बीसीसीआयनं सोमवारी संघ जाहीर केला. टीम इंडियात जानेवारीमध्ये होणाऱ्या या मालिकेंसाठी अनेक बदल करण्यात आले आहेत. यात भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहचे ट्वेंटी-२० आणि वन डे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे. रोहित व शमी ट्वेंटी-२० मालिकेत खेळणार नाही. संजू सॅमसनला ट्वेंटी-२० संघात पुन्हा स्थान मिळाले आहे. भारतीय संघासाठी आनंदाची बातमी म्हणजे शिखर धवनची ट्वेंटी-२० आणि वन डे मालिकेत वापसी होणार आहे.

रोहित शर्मानं २०१९ हे वर्ष आपल्या फलंदाजीनं प्रचंड गाजवलं. त्याने अनेक रेकॉर्डस् देखील तोडले. २०१९ या कॅलेंडर वर्षात वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत रोहित शर्मा १४९० धावांसह आघाडीवर आहे. रोहितने २०१९ या वर्षात सतत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आला आहे. त्यामुळे रोहितला विश्रांती देण्यात येणार असल्याचे समजते. दुखापतीमुळे शिखर धवन संघातून बाहेर होता आता तो संघात कमबॅक करणार आहे. तसेच बुमराहनेही दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेपूर्वी दुखापतीमुळे माघार घेतली आणि उपचारासाठी लंडनला गेला होता त्यामुळे बुमराहचेही कमबॅक होणार आहे.

२०२० च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका होणार असून ही मालिका दिनांक ५, ७ आणि १० जानेवारीला पार पडणार आहे. हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळले जाणार आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वन डे मालिका खेळली जाणार आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघात विराट कोहली, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन हे असणार आहेत.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/