टीम इंडियाच्या ‘या’ दिग्गज क्रिकेटरनं केलं विवाहित महिलेशी लग्न !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीम इंडियाच्या एका दिग्गज क्रिकेटरने लग्न झालेल्या महिलेशी लग्न केले आहे. आज त्या क्रिकेटरचा वाढदिवस आहे. अनेकांना याबाबत माहिती नसेलच. खास बात अशी की, ही लव्ह स्टोरीही अनेक वळणे असणारी आहेत. विशेष बाब अशी की, या महिलेला पहिल्या पतीपासून एक मुलगीही आहे. याच खेळाडूविषयी आपण जाणून घेणार आहोत.

आता हा दिग्गज क्रिकेटपटू नेमका कोण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. या दिग्गजाने भारताचं सुवर्णयुग पाहिलं आहे. भारताचं कर्णधारपदही त्याने भूषवलं आहे. इतकेच काय तर तो भारताच्या प्रशिक्षक पदावरही होता. आम्ही बोलत आहोत भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेबद्दल आणि त्याची पत्नी चेतना कुंबळेबद्दल. आज अनिल कुंबळेचा 49वा वाढदिवस आहे.

‘अशी’ आहे अनिल-चेतानाची लव्ह स्टोरी
चेतनाचे पहिले लग्न एका व्यावसायिकाशी झाले होते. दोघांना एक मुलगीही होती. दोघांचं खटकल्याने चेतना आपल्या मुलीसोबत वेगळी रहात होती. एका ट्रॅव्हल कंपनीत कुंबळे आणि चेतनाची ओळख झाली.

कुंबळेला चेतना खूप आवडली. कुंबळेने तिची सर्व माहितीही काढली. तिच्या फिदावर असणाऱ्या कुंबळेने चेतनाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. चेतनानेही पतीपासून घटस्फोट घेत कुंबळेसोबत विवाह थाटला. 1 जुलै 1999 रोजी दोघे लग्न बंधनात अकडले.

 

Visit : policenama.com