आता Facebook – WhatsApp वापरू शकणार नाहीत जवान, नौदलानं ‘स्मार्टफोन’वर घातली बंदी, सुत्रांची माहिती

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था : भारतीय नौदलाने आपल्या सर्व सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घातली आहे. एवढेच नव्हे तर नौदलाने जहाज व नेव्हीच्या एअरबेसवर स्मार्ट फोन घेऊन जाण्यासही बंदी घातली आहे. मिळालेल्या माहितीनुसार असे करण्यामागचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी नौदलात हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली सात जणांना अटक करण्यात आली होती. ह्या सात जणांवर पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप केला जात आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

आंध्र प्रदेश पोलिसांनी अलीकडेच पाकिस्तानमधील हेरगिरी रॅकेटचा पर्दाफाश केल्याचा दावा केला होता. या हेरगिरी रॅकेटचा पाकिस्तानशी संबंध असल्याचे पोलिसांनी म्हटले होते. या प्रकरणात भारतीय नौदलाच्या सात जवानांना अटक करण्यात आली होती. याशिवाय अनेक संशयितांचीही चौकशी करण्यात आली.

ऑपरेशन डॉल्फिनचे नोज :
पोलिसांकडून सांगण्यात आले होते कि, केंद्रीय गुप्तचर संस्था आणि नौदल गुप्तचर विभागासह पोलिस गुप्तचर विभागाने ‘ऑपरेशन डॉल्फिन नोज’ चालवत या हेरगिरी रॅकेटचा पर्दाफाश केला. देशातील विविध भागातून नौदलाचे 7 कर्मचारी आणि एक हवाला ऑपरेटरला अटक करण्यात आली होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/