10 वी, 12 वी पास उमेदवारांसाठी नौदलात नोकरीची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय नौदलात अनेक पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. नाविक पदांसाठी अविवाहित पुरुष उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 26 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज करु शकतात. पदांसंबंधित संपूर्ण माहिती जाहिरातीत देण्यात आली आहे.

महत्वाच्या तारखा –
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 26 जानेवारी 2020

भारतीय नौदल नाविक 2020 पदांचे वितरण –
डायरेक्ट एंट्री पेटीएम ऑफिसर
वरिष्ठ माध्यमिक भरती
मॅट्रिक भरती

शैक्षणिक योग्यता –
या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार 10 वी – 12 वी पास असावेत.

वयोमर्यादा –
किमान वय 17 वर्ष आणि कमाल वय 22 वर्ष निर्धारित आहे.
एसएसआर एमआर – किमान वय – 17 वर्ष आणि कमाल वय 21 वर्ष निश्चित करण्यात आले आहे.

निवड प्रक्रिया –
उमेदवारांची निवड नौदल केंद्रात परिक्षणाच्या आधारे केले जाईल. ट्रायल क्वालिफाय करणारे उमेदवारांची मुंबईत वैद्यकीय चाचणी होईल.

अर्ज कसे कराल –
उमेदवार 26 जानेवारी 2020 किंवा त्यापूर्वी आपला अर्ज सचिव, भारतील नौसेना खेल नियंत्रण बोर्ड, 7 वा मजला, चाणाक्य भवन, एकीकृत मुख्यालय, मॉड (नौसेना), नवी दिल्ली 110021 या पत्यावर पाठवू शकतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/