जेट एअरवेजला इंडियन ऑईलकडून दिलासा ; इंधन पुरवाठा पुर्ववत

मुंबई : वृत्तसंस्था – आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेज या विमान कंपनीला इंडियन ऑईलने दिलासा दिला आहे. कारण गेल्या दोन दिवसापासून जेट एअरवेजवरील संकट काही दूर होतांना दिसत नव्हते. त्यात सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी इंडियन ऑईलने जेट एअरवेजचा इंधन पुरवठा थांबवला होता.

शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यापासून इंधन पुरवाठ्यावर रोख लावण्यात आली होती . त्याबाबचे एक ट्विट करून त्यांनी जोपर्यंत थकबाकी मिळत नाही तोपर्यंत इंधन पुरवाठा केला जाणार नाही असे स्पष्ट केले होते. त्यानंतर कंपनीने आता हा निर्णय मागे घेत जेट एअरवेजला इंधन पुरवण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, जेटने आधीच विमानांची संख्या घटवली आहे. जेट एअरवेज ही कंपनी एक तोट्यातील प्रवासी विमान वाहतूक कंपनी असून या कंपनीची मालकी स्टेट बँक इंडियाच्या नेतृत्वाखालील वित्त संस्थांकडे आहे. फक्त डिसेंबरच्या पगारातील थकीत रक्कम पायलट आणि इतर कर्मचाऱ्यांना देण्याचे या बँकेने म्हटलेले आहे.