वीरेंद्र सेहवाग चहलला म्हणतो, भावा ‘याचेच’ पैसे मिळतात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल याने आज २९ व्या वर्षात पदार्पण केले आहे. फार कमी कालावधीत त्याने भारतीय संघात आपल्या कामगिरीने स्थान मिळवत उत्तम कामगिरी करत हे स्थान टिकवून देखील ठेवले आहे. आयपीएलमधील आपल्या रॉयल चॅलेंजर बँगलोर संघाकडून खेळताना त्याने टी-२० मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याचबरोबर स्थानिक क्रिकेटमध्ये देखील त्याने उत्तम कामगिरी करत भारतीय संघाचे दरवाजे आपल्यासाठी उघडे केले.

त्याच्या वाढदिवशी भारतीय संघातील सहकाऱ्यांनी त्याला या विशेष दिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग, सलामीवीर रोहित शर्मा, शिखर धवन, कुलदीप यादव, चेतेश्वर पुजारा यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर बीसीसीआयने देखील त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. वीरेंद्र सेहवाग याने खास आपल्या शैलीत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने ट्विटरवरून त्याला शुभेच्छा देताना त्याने चहलचा एक फोटो ट्विट करून लिहिले कि, याच ऍटिट्यूडचे आपल्याला पैसे मिळतात. त्यामुळे तुझे चालू राहूदे.

दरम्यान, पुढील महिन्यात होणाऱ्या विंडीज दौऱ्यातील एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांसाठी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला आहे.

https://www.loksatta.com/krida-news/indian-players-wishes-their-yuzvendra-chahal-on-his-29th-birthday-psd-91-1936212/

आरोग्यविषयक वृत्त –