खुशखबर ! रेल्वे ‘फ्री’मध्ये करणार तुमच्या ‘फोन’चं ‘रिचार्ज’, तुम्हाला करावे लागेल फक्त ‘हे’ काम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने मोठे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान मोदींनी प्लॅस्टिक बंदीचे मिशन सुरु केल्यानंतर त्याचाच भाग म्हणून रेल्वे प्रवाशांचे रिचार्ज करणार आहे, जे रेल्वे स्टेशनवरुन प्लास्टिक बॉटल नष्ट करण्याच्या मशीनचा वापर करतील. पंतप्रधान मोदींनी स्वतंत्रता दिवस साजरा करत असताना देशवासियांना आवाहन केले होते की सिंगल यूज प्लॉस्टिकचा वापर बंद करा आणि प्लास्टिक बॉटल पर्याय शोधण्याचे आवाहन केले होते.

2 ऑक्टोबरपासून रेल्वे स्टेशनवर प्लास्टिकच्या बॉटलचा वापर बंद
रेल्वेने सूचना दिल्या आहेत की, 2 ऑक्टोबरपासून रेल्वेच्या परिसरात सिंगल यूज प्लास्टिकचा वापर होणार नाही, रेल्वेबोर्डाचे अध्यक्ष वीके यादव म्हणाले की, स्टेशनवर बॉटल नष्ट करणाऱ्या 400 मशीन लावण्यात आल्या आहेत. याचा वापर करणाऱ्या व्यक्तींना आपला मोबाइल नंबर मशीनमध्ये टाकावा लागेल. त्यानंतर त्याचे फोन रिचार्ज होईल. परंतू रिचार्जची माहिती अजून देण्यात आलेली नाही.

वीके यादव म्हणाले की, सध्या 128 स्टेशन असे आहेत जेथे बॉटल नष्ट करणाऱ्या मशीन लावण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत की, स्टेशन वरील प्लास्टिक बॉटल जमा करुन त्याला रिसायकलसाठी पाठवण्यात यावेत.

रेल्वे स्टेशनवर फक्त रेल नीर या पाण्याच्या बॉटल विकव्यात यासाठी काही नियम आहेत. त्यासाठी पुढील वर्षात आणखी 6 रेल नीर प्लांट सुरु करण्यात येणार आहे. हे प्लांट नागपूर, हावडा, गुवाहटी, जबलपूर, भुसावल आणि उना मध्ये सुरु करण्यात येईल. तर विजयवाडा, विशाखापट्टनम आणि भुवनेश्वरमध्ये देखील रेल नीरचे प्लांट सुरु करण्यात येणार आहे. IRCTC ने मागील वर्षी 22 कोटी बॉटल विकल्या आहेत, ज्यातून 33 कोटीची कमाई केली आहे.

You might also like