भारतातील पहिल्या खासगी रेल्वेमध्ये मिळणार विमानासारख्या ‘या’ सुविधा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतात रेल्वे विभागात खासगीकरण करण्यात आले आहे. भारतात पहिली खासगी रेल्वे धावणार आहे. तिचे नाव ‘तेजस एक्सप्रेस’ आहे. ही रेल्वे लखनऊ ते नवी दिल्ली दरम्यान धावणार आहे. भारतीय रेल्वेनं ट्रायल म्हणून ही रेल्वे आयआरसीटीसीला द्यायचा निर्णय घेतला आहे. या खासगी रेल्वेत अनेक आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. आयआरसीटीसी १०० दिवसांच्या आत ट्रेन सुरु करण्याचे ध्येय ठेवून काम करत आहे. तसंच आयआरसीटीसी दुसऱ्या मार्गांबद्दलही विचार करत आहे.

ही ट्रेन भारतातील पहिली रेल्वे असून यात विमानासारख्या काही सेवा देण्यात आल्या आहेत. तसंच उत्तर प्रदेशच्या आनंद नगर रेल्वे स्टेशनमध्ये पार्क आहे. रेल्वेसाठी सुरु असलेल्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रेल्वे खासगी कंपनीच्या ताब्यात दिली जाणार आहे.

Tejas-Train

रेल्वेचे खासगीकरण करताना यात विमानातील सोयी देण्यात आल्या आहेत. विमानाप्रमाणे या ट्रेनमध्ये प्रत्येक सीटवर LCD स्क्रीन लावलेला आहे. तसंच प्रत्येक सीटवर अटेंडंट बटण आहे. ते प्रेस करून तुम्ही सहाय्यकाला बोलवू शकता. तसंच या रेल्वेत साध्या लाईटचा वापर न करता LED लाइटचा वापर करण्यात आला आहे.

रेल्वेत सिगरेट स्मोकिंग डिटेक्ट करण्यासाठी ऑटो डिटेक्टर लावण्यात आले आहेत. तसेच रेल्वेमधील सुरक्षिततेबाबत लक्ष देत रेल्वेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तर प्रत्येक सीटवर चार्जिंग आणि युएसबी केबल लावण्यात आली आहे.

दरम्यान, आरामदायी सीट्स, एलईडी लाइट, बायो टॉयलेट, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि मेट्रो ट्रेनसारखे आपोआप उघडणारे दरवाजे अशा सुविधा ट्रेनमध्ये उपलब्ध आहेत. तर रेल्वेचा खर्चही लवकर निघावा म्हणून या रेल्वेचे तिकीट शताब्दी रेल्वेच्या तिकीटापेक्षा २० टक्के अधिक असणार आहे. तर रेल्वेतील मोटरमन आणि असणारे गार्ड भारतीय रेल्वेचे असणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर, ‘हे’ 7 महत्वाचे फायदे होतात, जाणून घ्या

जांभळातील पोषक तत्वे शरीराच्या ‘या’ 3 भागांना ठेवातात निरोगी, जाणून घ्या सर्वकाही

पाय थंड पडणे, सूज येणे ही गंभीर समस्या, वेळीच ‘हे’ उपचार करा

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

सूर्यफुलाच्या बियांपासून ‘हे’ फायदे तर भोपळ्याच्या बिया ‘या’ ४ गोष्टींसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या