home page top 1

खुशखबर ! आता रेल्वेच्या ‘प्लॅटफॉर्म’ तिकिटावरूनही करता येणार प्रवास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वेच्या नव्या नियमांनुसार आपत्कालिन परिस्थितीत आता प्रवासी प्लॅटफॉर्म तिकिटावरही रेल्वेतून प्रवास करु शकणार आहेत. परंतु यासाठी रेल्वेने एक अट घातली आहे. ही अट पूर्ण केली तर काम सोपे होणार आहे. नाही तर रेल्वेत ज्या वर्गाच्या कोचमधून प्रवास करणार आहे, त्याचे रितसर तिकीट रेल्वेत चढल्यानंतर घ्यावे लागेल.

रेल्वेची प्रवास करण्याची मुभा
प्लॅटफॉर्म तिकिटावरून प्रवास करण्याची मुभा रेल्वेने दिली आहे. यासाठी संबंधित प्रवाशाला गार्ड किंवा टीसीचे परवानगी पत्र घ्यावे लागणार आहे. जर यासाठी एखादया वेळेस प्रवाशाकडे वेळ नसल्यास रेल्वेमध्ये जाऊन नियमित प्रक्रिया पूर्ण करता येते. त्यानंतर तो प्रवासी प्रवास करू शकतो. रेल्वेच्या नियमानुसार हे परवानगी पत्र रेल्वेचे गार्ड, टीसी किंवा अन्य अधिकाऱ्यांकडून घेता येऊ शकते, अशी अट कायम आहे.

रेल्वेमध्ये चढल्यानंतर प्रवाशाला याबाबत टीसीला माहिती द्यावी लागेल. त्यानंतर प्रवाशाच्या इच्छित स्थळी उतरावयाचे आहे, त्याठिकाणचे टीसीकडून तिकिट बनवून घेता येईल. परंतु यासाठी केवळ २५० रूपये दंडाच्या स्वरूपात द्यावे लागणार आहेत. तसेच ज्या श्रेणीतून प्रवास करायचा असेल, त्याच श्रेणीचे शुल्क भरावे लागेल.

सावधान, तर होऊ शकतो दंड
प्रवाशी ज्या रेल्वे स्थानकावर रेल्वेत चढला ते बोर्डिंग स्टेशन मानले जाणार आहे. परंतु याद्वारे प्रवसाची मुभा मिळणार असली तरी तिकिटाचे आरक्षण मात्र देण्यात येणार आहे. दरम्यान, सध्या प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत १० रूपये आहे. कोणतीही व्यक्ती जाणूबुजून अथवा फसवण्याच्या बहाण्याने या तिकिटावर प्रवास करत असेल, तर त्याला तुरूंगवारीही होऊ शकते. तसेच यासाठी १ हजार २६० रूपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होवू शकतात.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like