भारताच्या पीटी उषाला प्रतिष्ठीत सन्मान, IAAF नं केलं ‘वेटरन पिन अवॉर्ड’नं सन्मानित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘पायोली एक्सप्रेस’ म्हणून प्रसिद्ध असलेली भारताची माजी अ‍ॅथलीट आणि ऑलिम्पियन पी.टी. उषा हिला प्रतिष्ठित समजला जाणारा आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचा (IAAF) वेटरन पिन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. उषाने बुधवारी ट्विट करत ही माहिती दिली. त्यांनी ट्विट करत आयएएएफ आणि त्यांचे अध्यक्षांचे आभार मानले आणि देशातील अ‍ॅथलेटिक्सला प्रोस्ताहन देण्यात यावे असे ही सांगितले.

उषाला 24 सप्टेंबरला कतारमध्ये झालेल्या आयएएएफच्या 52 व्या काँग्रेसमध्ये हा प्रतिष्ठित सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले. उषा 1984 साली लॉस अ‍ॅंजेलिस ऑलिंपिकमध्ये 400 मीटर धावेत फायनलमध्ये पोहचली होती, पंरतू काही सेकंदाच्या फरकांने तिला कांस्य पदक मिळण्यापासून दूर रहावे लागेल.

तिला 1983 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला होता. दोन वर्षांनंतर 1985 साली तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उषा नव्या खेळाडूंसाठी आपली अकादमी देखील चालवते. तिने मिळालेल्या सन्मानाचा फोटो ट्विट केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. तिला मिळालेल्या सन्मानामुळे तिचे चाहते देखील आनंदी आहेत.

Visit : policenama.com