मिताली राजची टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तिने आपल्या निवृत्तीची घोषणा आज केली आहे. मितालीने आत्तापर्यंत 89 टी-२० सामने खेळताना 2 हजार 364 धावा केल्या आहेत. टी-२० मध्ये सर्वाधीक धावा मितालीच्या नावावर आहेत. तिने टी-२० प्रकारात भारताचे 32 सामन्यात नेतृत्त्व केले आहे.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृती जाहिर करताना 2021 च्या विश्वचषकावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सांगितले. टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारी मिताली राज पहिली भारतीय फलंदाज ठरली होती. विशेष म्हणजे मितालीने रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या आधी टी-२० मध्ये 2 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. मिताली राजच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यात अयशस्वी ठरला.

मिताली राजने आपला शेवटचा टी -२० सामना इंग्लंडविरुद्ध गुवाहटीत खेळला होता. या सामन्यात तीने 32 चेंडूत 30 धावा केल्या होत्या. मिताली टी-२० च्या 2000 कल्बमध्ये सामिल होणारी पहिली भारतीय महिला आहे. ती टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे.

आरोग्यविषयक वृत्त –