भारताची दोन विमानं पाडली, एक वैमानिक ताब्यात, पाकचा दावा 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानी लष्कर प्रमुख मेजर जनरल असीफ गफूर यांनी नुकताच एक खळबळजनक दावा केला आहे. आज सकाळी पाकिस्तानच्या LOC च्या आत भारतीय एअर फोर्स ची दोन विमान दाखल झाली त्या दोन्ही विमानांना पाडले. त्यातील  एका भारतीय वैमानिकाला पाकिस्तानी सैनिकांनी ताब्यात घेतले आहे. असा दावा पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाने केला आहे. यासंदर्भातले ट्विट त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून प्रसिद्ध केले आहे.

 

ट्विट मध्ये त्यांनी म्हंटले आहे की, “पाकिस्तानी हवाई दलाने सकाळी एअर स्ट्राईक केला. त्यांनंतर भारतीय हवाई दलाने LOC ओलांडली. त्यानंतर पाकिस्तानी एअरस्पेसच्या आत दोन भारतीय एअरक्राफ्ट खाली पाडले. त्यापैकी एक विमान ए जे आणि के AJ&K अंतर्गत पडले तर दुसरे विमान IOK च्या आत पडले त्यातील एका भारतीय वैमानिकाला पाकिस्तानी सैनिकांकडून ताब्यात घेण्यात आले आहे”.

पाकच्या विमानांची घुसखोरी
पाकिस्तानी विमानांनी भारताच्या हद्दीत राजौरीतील नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी केल्याची माहिती पीटीआय़ने दिली आहे. पाकिस्तानी विमानाने भारताच्या हवाई हद्दीत राजौरीत घूसून बॉम्ब टाकल्याची शक्यता आहे. भारतीय विमानांनी त्यांना परतवून लावले आहे. अशी माहिती पीटीआय़ या वृत्तसंस्थेने दिली आहे.

भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानमध्ये घूसून मोठी कारवाई काल केली. त्यानंतर चिडलेल्या पाकिस्तानकडून यावर काहीतरी केलं जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. राजौरी भागात कालपासून तणाव होता. त्यानंतर आज सकाळी पाकिस्तानच्या किमान तीन विमानांनी भारतीय हवाई हद्दीत राजौरीतील नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी केली. त्यानंतर त्यांनी तेथे परताना बॉम्बेही टाकल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय विमानांनी त्यांना परतवून लावले असेही समोर आले आहे. परंतु भारतीय हवाई दलाकडून संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यानंतर भारतातील काश्मीरमधील श्रीनगर विमानतळ तीन तासांसाठी विमान वाहतुक रोखण्यात आली आहे. त्यासोबतच इतर विमानतळांना हाय अलर्ट देण्यात आले आहे.

Loading...
You might also like