इंदिरा अहिरे यांनी दिले महिलांना अन्नधान्याचे कीट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या विषाणूने जगभर थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर 24 मार्चपासून लॉकडाऊन असून, उद्योग, व्यवसाय, कंपन्या बंद असल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे हाताला काम नाही, तर पगार नाही, अशी अवस्था मजूरवर्गाची झाली आहे. त्यांना मदत नव्हे, तर कर्तव्य म्हणून धान्य देण्याचा उपक्रम सुरू केल्याचे काँग्रेस महिला कार्यकारिणी सदस्या इंदिरा अहिरे यांनी सांगितले.

अहिरे म्हणाल्या की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा चारुताई टोकस यांच्या मार्गदर्शनाखाली लॉकडाऊमध्ये बेरोजगार झालेल्या महिलांना गहू, तांदूळ, तेल, पोहे, मसाला, साबण, साखर, तूरडाळ आदी धान्याचे कीट तयार करून कोंढवा (साईनगर), राजीव गांधीनगर, अप्पर सुपर, अण्णा भाऊ साठेनगर येथील महिलांना दिले आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मदत नव्हे, तर कर्तव्य म्हणून हा उपक्रम हाती घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, धान्याचे कीट तयार करून घरोघरी महिलांपर्यंत नेण्यासाठी द.स. पुणेकर, विश्वास दिघे, मणियार अकबर यांचे विशेष सहकार्य लाभले, असे अहिरे यांनी स्पष्ट केले.