सायनाला इंडोनेशिया मास्टर्सचे विजेतेपद

जकार्ता : वृत्तसंस्था – भारताची फुलराणी सायना नेहवालने पुन्हा एकदा देशाचे नाव उंचावले आहे. सायनाने इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटनचे अजिंक्यपद पटकावले. सायनाची लढत स्पेनला तीनवेळा वर्ल्ड चॅम्पियनपद मिळवून देणारी कॅरोलीना मारीन सोबत होती. पहिल्या गेममध्ये कॅरोलीनने सायनावर १०-४ अशी आघाडी घेतली होती. पण कॅरोलीनने दुखापत झाल्याने सामना अर्धवट सोडला. त्यामुळे सायनाला विजयी घोषित करण्यात आले. त्यामुळे सायनाची वर्षाची सुरवात विजयाने झाली आहे.

सामन्याच्या सुरूवातीला मारीनने ३-० अशी आघाडी घेतली होती. यानंतरदेखील आपल्या खेळाची लय कायम राखत  कॅरोलीनने सायनावर २-९ अशी आघाडी घेतली. पण सामन्यादरम्यान कॅरोलीनच्या गुडघ्याला दुखापत झाली. दुखापत इतकी गंभीर होती की तिला मैदान सोडावे लागले. त्यामुळे पाहिल्या गेममध्ये १०-४ अशी पिछाडीवर पडूनही सायनाला विजयी घोषीत करण्यात आले.