Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! फ्रेन्डस् इलेव्हन संघाची विजयी सलामी; वैंकिज् इलेव्हनचा दणदणीत विजय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Indrani Balan Foundation | स्पोर्ट्सफील्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित पहिल्या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत फ्रेन्डस् क्रिकेट क्लब संघाने फार्मा इलेव्हन संघाचा केवळ ६ धावांनी पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली. वैंकिज् संघाने १०५ धावांनी विजय मिळवत स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. (Indrani Balan Foundation)

 

मुंढवा येथील लिजंडस् क्रिकेट मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात संदीप धरंगांवकर याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर फ्रेन्डस् क्रिकेट क्लबने फार्मा इलेव्हन संघाचा पराभव केला.
फ्रेन्डस् संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना धाव-फलकावर २० षटकात १५९ धावा लावल्या.
यामध्ये संदीप धरंगांवकर (५० धावा), निखील राईलकर (२६ धावा) व सोहम सरवदे (२२) यांनी संघाच्या डावाला आकार दिला.

 

या आव्हानाचा पाठलाग करताना फार्मा इलेव्हनची सुरूवात खराब झाली. पहिल्या ९.४ षटकात त्यांचे ४ फलंदाज बाद झाले होते व केवळ ४० धावा झाल्या होत्या.
पण यानंतर फलंदाजीला आलेल्या अभय शिंदे याने नाबाद ८४ धावांची खेळी केली.
त्याला दिपेश एम. यांनी नाबाद २५ धावांची साथ दिली.
या दोघांनी पाचव्या गड्यासाठी ६१ चेंडूत ११३ धावांची नाबाद भागिदारी केली.
पण संघाला विजय मिळवून देण्यात त्यांना यश आले नाही.
संघाचा डाव २० षटकात १५३ धावांवर मर्यादित राहीला.
अखेरच्या षटकात १५ धावांची आवश्यकता असताना फ्रेन्डस् संघाचा कर्णधार प्रफुल्ल मानकर याने
केवळ ८ धावा दिल्या व संघाचा विजय साकार केला. (Indrani Balan Foundation)

 

दुसर्‍या सामन्यात अमित सिंग याच्या ५२ धावांच्या खेळीमुळे वैंकिज् इलेव्हनने आर्यन्स् संघाचा १०५ धावांनी दणक्यात पराभव केला.
वैंकिज संघाने २० षटकात २०६ धावांचे आव्हान उभे केले होते.
या आव्हानासमोर आर्यन्स् क्रिकेट क्लबचा डाव २० षटकात १०१ धावांवर मर्यादित राहीला.

 

सामन्यांचा सविस्तर निकालः

 

१) फ्रेन्डस् क्रिकेट क्लबः २० षटकात ६ गडी बाद १५९ धावा (संदीप धरंगांवकर ५० (३१, ८ चौकार, १ षटकार), निखील राईलकर २६, सोहम सरवदे २२, अमोल एम. २-२०) वि.वि. फार्मा इलेव्हनः २० षटकात ४ गडी बाद १५३ धावा (अभय शिंदे नाबाद ८४ (५०, ८ चौकार, ५ षटकार), दिपेश एम. नाबाद २५, मनोहर पाटील २-८); सामनावीरः संदीप धरंगांवकर;

 

२) वैंकिज् इलेव्हनः २० षटकात १० गडी बाद २०६ धावा (अमित सिंग ५२ (२८, ५ चौकार, ३ षटकार), जयेश राठोड ४०, आदित्य कदम ३९, सुजित उबाळे २२, रोहन दांदळे ३-४०, साहील कड २-२०) वि.वि. आर्यन्स् क्रिकेट क्लबः २० षटकात ४ गडी बाद १०१ धावा (साबिर शेख ६४ (५६, ८ चौकार, २ षटकार), ऋषी नाळे नाबाद २८, प्रणित राणे २-१७); सामनावीरः अमित सिंग; (Indrani Balan Foundation)

 

Web Title : Indrani Balan Foundation | First ‘Indrani Balan Winter T20 League’ cricket tournament! Friends XI’s winning opener; Vanquish XI’s resounding victory

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Weather | राज्यात अल्हाददायक थंडीची चाहूल ! विदर्भात पावसाचा अंदाज

WhatsApp चा दिवाळी धमाका ! कंपनीकडून 255 रुपये ‘कॅशबॅक’ची ऑफर, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ

Bhusaval-Daund Train | भुसावळ-दौंड मेमू साप्ताहिक विशेष गाड्यांना मुदतवाढ; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय