Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप संघाने पटकावले विजेतेपद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Indrani Balan Winter T-20 League | पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप संघाने एमईएस क्रिकेट क्लब संघाचा ९ धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. (Indrani Balan Winter T-20 League)

 

सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूल मैदानावर झालेल्या अतितटीच्या अंतिम सामन्यात मेहूल पटेलच्या ६९ धावांच्या जोरावर पुनित बालन ग्रुप संघाने एमईएस क्रिकेट क्लबचा ९ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुनित बालन ग्रुप संघाने १७१ धावा धावफलकावर लावल्या. मेहूल पटेल याने सर्वाधिक ६९ धावांची खेळी केली. उपांत्य सामन्यामध्ये शतक झळकावणार्‍या प्रीतम पाटील याने या सामन्यातही ४४ धावा तर, ऋतुराज विरकर याने ३० धावांचे योगदान दिले. यामुळे संघाने १७१ धावांचे आव्हान उभे केले. (Indrani Balan Winter T-20 League)

 

एमईएस क्रिकेट क्लबने सावधपणे धावसंख्येचा पाठलाग करायला सुरूवात केली. जय पांडे (५१ धावा) आणि अदवय सिधये (३७ धावा) यांनी दुसर्‍या गड्यासाठी ३५ चेंडूत ५५ धावांची भागिदारी करून संघाचे आव्हान कायम ठेवले. पण पुनित बालन ग्रुपच्या जलदगती गोलंदाज सागर सावंत (३-२९) आणि उमर शहा (३-२४) यांनी अचूक मारा करून एमईएस क्रिकेट क्लबसाठी आव्हान अवघड केले. एमईएस संघाला निर्णायक क्षणी धावांची गती वाढविण्यात अपयश आले आणि संघाचा डाव १६२ धावांवर मर्यादित राहीला.

स्पर्धेतील विजेत्या पुनित बालन ग्रुप संघाला १ लाख ५१ हजार रूपये आणि करंडक तर,
उपविजेत्या एमईएस क्रिकेट क्लब संघाला ७५ हजार रूपये आणि करंडक देण्यात आला.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू देवदत्त नातू याला २१ हजार रूपये, करंडक आणि इलेक्ट्रिकल बाईक देण्यात आली.
सर्वोत्कृष्ट फलंदाज प्रीतम पाटील, सर्वोत्कृष्ट गोलंदाज अजय बोरूडे आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पलाश कोंढारे
या सर्वांना प्रत्येकी ११ हजार रूपये आणि करंडक देण्यात आला.

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः अंतिम सामनाः
पुनित बालन ग्रुपः २० षटकात ८ गडी बाद १७१ धावा (मेहूल पटेल ६९ (४६, ४ चौकार, ४ षटकार),
प्रीतम पाटील ४४, ऋतुराज विरकर ३०, योगेश चव्हाण ३-२१) वि.वि. एमईएस क्रिकेट क्लबः २० षटकात ८ गडी बाद १६२ धावा (जय पांडे ५१ (४४, ५ चौकार),
अदवय सिधये ३७, सागर सावंत ३-२९, उमर शहा ३-२४); सामनावीरः मेहूल पटेल;

 

वैयक्तिक पारितोषिकेः
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूः देवदत्त नातू (गेम चेंजर्स, ४०६ धावा आणि ६ विकेट);
सर्वोत्कृष्ट फलंदाजः प्रीतम पाटील (पुनित बालन ग्रुप, ४०५ धावा);
गोलंदाजः अजय बोरूडे (एसके डॉमिनेटर्स, १६ विकेट);
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकः पलाश कोंढारे (माणिकचंद ऑक्सिरीच, १२ विकेट);

 

Web Title : – Indrani Balan Winter T-20 League | 2nd ‘Indrani Balan Winter T20 League’ Championship Cricket Tournament; Punit Balan Group won the title

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rana Daggubati | ‘राणा नायडू’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित; पहिल्यांदाच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील काका पुतण्याची जोडी प्रेक्षकांसमोर

Police Inspector Transfer | नाशिक परिक्षेत्रामधील 7 पोलिस निरीक्षकांच्या परिक्षेत्रांतर्गत बदल्या

Chhagan Bhujbal | उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याची घाई केली नसती तर…, छगन भुजबळांचे मोठे विधान (व्हिडिओ)