Indrani Balan Winter T 20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा

माणिकचंद ऑक्सिरीच, एमईएस क्रिकेट क्लब संघांनी उद्धघाटनाचा दिवस गाजवला !!

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Indrani Balan Winter T 20 League 2022 | बालन ग्रुप (Balan Group) तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ (Indrani Balan Winter T 20 League 2022) अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत माणिकचंद ऑक्सिरीच आणि एमईएस क्रिकेट क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्धघाटनाचा दिवस गाजवला. स्पर्धेचे उद्धघाटन बालन ग्रुपचे कार्यकारी संचालक पुनित बालन (Punit Balan) यांच्या हस्ते आज रोजी करण्यात आले.

 

सहकारनगर येथील ल.रा. शिंदे हायस्कूल मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत सुशिल बुरले याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर एमईएस क्रिकेट क्लबने द गेम चेंजर्स संघाचा ४ गडी राखून पराभव केला. दुसर्‍या सामन्यात सुरज राई याच्या नाबाद ५४ धावांच्या जोरावर माणिकचंद ऑक्सिरीच संघाने पुणे पोलिस संघाचा ७ गडी राखून पराभव करत दणक्यात सुरूवात केली. (Indrani Balan Winter T 20 League 2022)

 

या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना बालन ग्रुपचे कार्यकारी संचालक पुनित बालन यांनी सांगितले की, या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी झाले असून स्पर्धेत चार लाख रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेला माणिकचंद ऑक्सिरीच यांचे प्रायोजक्त्व लाभले आहे.

 

पुणे पोलीस, माणिकचंद ऑक्सिरीच, हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमी, पुनित बालन ग्रुप, द पुना क्लब, न्युट्रीशियस इलेव्हन, व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी, पुनित बालन केदार जाधव अ‍ॅकॅडमी, एसके डॉमिनेटर्स, एमईएस क्रिकेट क्लब, क्रिकेट अ‍ॅकॅडमी ऑफ पठाणस्, ईऑन वॉरीसर्य, ब्रेव्हहार्ट क्रिकेट अ‍ॅकॅडमी, इव्हानो इलेव्हन, द गेम चेंसर्ज संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या संघाला १ लाख ५१ हजार रूपये व करंडक तर, उपविजेत्या संघाला ७५ हजार रूपये आणि करंडक मिळणार आहे. या शिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि यष्टीरक्षक यांना प्रत्येकी ११ हजार रूपये आणि करंडक तर, मॅन ऑफ द सिरीज खेळाडू याला इलेक्ट्रिक बाइक, २१ हजार रूपये, बॅट, करंडक आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर करंडक आणि ५ हजार रूपये अशी पारितोषिकांची रेलचेल या स्पर्धेत असणार आहे.

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
द गेम चेंजर्सः १९ षटकात ५ गडी बाद ११७ धावा (देवदत्त नातू ६० (५१, ५ चौकार, ३ षटकार),
नौशाद शेख २४, सुशिल बुरले ३-२५) वि.वि. एमईएस क्रिकेट क्लबः १९ षटकात ६ गडी बाद १२३ धावा
(हर्षल तिडके ४२, योगेश चव्हाण २३, हितेश वाळुंज ३-९); सामनावीरः सुशिल बुरले;

 

पुणे पोलिसः १९ षटकात ६ गडी बाद १४१ धावा (अमरनाथ लोणकर ३१, विपुल गायकवाड २०, पृथ्वीराज गायकवाड २०,
शुभम उपाध्याय २-१८, ऋषभ राठोड २-३०) पराभूत वि. माणिकचंद ऑक्सिरीच: १५.५ षटकात ३ गडी बाद १४३ धावा
(सुरज राई नाबाद ५४ (३६, ४ चौकार, ३ षटकार), श्रीधर बारोट ५३ (३६, ४ चौकार, ३ षटकार),
ऋषभ राठोड नाबाद २५); सामनावीरः सुरज राई.

 

Web Title :- Indrani Balan Winter T20 League 2022 | 2nd ‘Indrani Balan Winter T20 League’ Championship Cricket Tournament

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bachchu Kadu | मुख्यमंत्री शिंदे 50 आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार त्याबद्दल बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

Pune Accident | स्कूल बसमधून पडून मदतनीस महिलेचा मृत्यू, शहरात वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू

Jitendra Awhad | “राजीनामा माझ्या बापाकडे दिला आहे, आता पुढे ते ठरवतील” जितेंद्र आव्हाडांचे राहुल नार्वेकरांना प्रतिउत्तर