Coronavirus : ‘टॉयलेट’ सीट चाटून दिलं होतं ‘कोरोना’ व्हायरस चॅलेंज, तपासणीत आढळला ‘पॉझिटिव्ह’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसला लोक अजूनही गंभीर्याने घेत नाही. कारण लोक सोशल मीडियावर कोरोना व्हायरस संबंधित एकमेकांना चॅलेंज देताना दिसले. हे नक्कीच एक चॅलेंज नाही हे सर्वांना कळायला हवे. हेच आता एका टिकटॉक इंफ्ल्यूएंसरला लक्षात आले आहे. गेशानमेंडेस नावाच्या एका व्यक्तीने काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरस चॅलेंजमध्ये सहभाग घेतला होता, ज्यात टॉयलेट सीटच्या किनाऱ्याला चाटायचे होते. आता माहिती मिळत आहे की याच व्यक्तीला कोरोना झाला आहे. तो चाचणीत पॉझिटिव्ह आला आहे.

टिकटॉक वर सुरु झालेल्या या चॅलेंजकडे कोरोनाची एक मस्करी म्हणून पाहायले गेले. त्यातून हे सिद्ध करायचे होते की हा आजार पसरत नाही. कोविड – 19 रिस्पायटरी ड्रॉपलेट्सद्वारे पसरते आणि जगभरात या व्हायरसमुळे 20,000 लोकांचा मृत्यू झाला आहे.

टिकटॉक इंफ्लूएंसर गेशावमेंडस याने या चॅलेंजमध्ये सहभाग घेतला होता. टिकटॉक इंफ्ल्यूएंसरने ट्विटरवर आपले रुग्णालयात उपचार घेत असलेले फोटो शेअर करत लिहिले की मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. परंतु आता हे अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे.