फायद्याची गोष्ट ! फक्त 100 रुपयांत LIC चा 75 हजारांचा विमा ‘कव्हर’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – लोक आता आरोग्य आणि जीवन विमा (Insurance) याबद्दल अधिक सावध सावध झाले आहेत त्याला कारण कोरोना महामारी. केंद्र सरकारही सामान्य लोकांना आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसी (Insurance)  देण्यास सतर्क असल्याचे दिसून येत आहे. जे संघटित क्षेत्रात नोकरी करत नाहीत अशा लोकांचा समावेश सामान्य माणसाच्या कक्षेत करण्यात आला आहे. अशा लोकांसाठी भारतीय जीवन विमा महामंडळाने ( LIC Policy ) आम आदमी विमा योजना (Aam Aadmi Bima Yojana) आणली आहे. ॲक्सिडेंटल डेथ (अपघाती मृत्यू) कव्हरेजशिवाय आजीवन पॉलिसी देखील उपलब्ध आहे.

याबद्दल जाणून घ्या…
एलआयसीच्या आम आदमी पॉलिसीअंतर्गत, विमाधारकाच्या नैसर्गिक मृत्यूवर ३०,००० रुपयांचे पॉलिसी कव्हर मिळते.
हा लाभ पॉलिसीच्या मुदती दरम्यान मृत्यूवर मिळू शकेल.
याचा अर्थ असा आहे की जर एखाद्या व्यक्ती या पॉलिसीचा लाभ घेत असेल आणि त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला ३०,००० रुपये मिळतील.
याशिवाय, या एलआयसीच्या पॉलिसीमुळे अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यासही त्यांना लाभ मिळू शकेल.

 

विमा कव्हर ७५,००० रुपयांचा मिळेल
एलआयसी आम आदमी विमा योजनेअंतर्गत अपंगत्व असल्यास पॉलिसीधारकास ३७,५०० रुपये मिळतील. अपघाती मृत्यू झाल्यानंतर नॉमिनीला या पॉलिसीअंतर्गत ७५,००० रुपयांचा विमा कव्हर मिळू शकेल.
विमा योजना दोन सामाजिक योजना एकत्र करून बनविली आहे.
ही आम आदमी विमा योजना आणि जनश्री विमा योजना आहे.
ग्रामीण भागातील गरीब घटकांना त्याचा लाभ मिळावा, यासाठी ही योजना सुरू केली गेली.
या योजनेंतर्गत, घरात कमावणाऱ्या व्यक्तीला त्याचे कव्हरेज मिळते.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्रितपणे या योजनेचा प्रीमियम भरतात.

जाणून घ्या अधिक सुविधाबद्दल …
एलआयसीच्या या योजनेअंतर्गत पॉलिसीधारकाला बर्‍याच सुविधा मिळतात.
या पॉलिसीवर अ‍ॅडऑन देखील मिळते.
या अॅडऑन अंतर्गत इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत शिकणार्‍या जास्तीत जास्त दोन मुलांना शिष्यवृत्ती देखील मिळते. हे नोडल एजन्सी मॉडेलवर आधारित आहे.
नोडल एजन्सींमध्ये पंचायत, स्वयंसेवी संस्था आणि बचत गटांचा समावेश आहे.
नोडल एजन्सी जवळच्या पेन्शन आणि ग्रुप स्कीम ऑफिस किंवा कोणत्याही एलआयसी ऑफिसला भेट देऊन या योजनेत सामील होऊ शकतात.

पात्रता आणि भरावा लागणारा प्रीमियम
१८ ते ५९ वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती एलआयसी आम आदमी विमा योजनेचा लाभ घेऊ शकतात. एलआयसी आम आदमी विमा योजनेचे प्रीमियम २०० रुपये प्रति वर्ष आहे. यापैकी ५० टक्के म्हणजेच १०० रुपये राज्य सरकार किंवा केंद्र शासित प्रदेश सरकार देतील. अशा प्रकारे पॉलिसीधारकास वर्षामध्ये फक्त १०० रुपये प्रीमियम भरावा लागतो. याविषयी अधिक माहितीसाठी आपण एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

READ ALSO THIS :

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !