सावधान ! राजधानी दिल्लीत ISI चे 2 आतंकवादी घुसल्याची माहिती, तपास यंत्रणांकडून ‘रेखाचित्र’ जारी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये भारताने कलम 370 रद्द केल्यानंतर चवताळलेला पाकिस्तान गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या मदतीने भारतात दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर आता राजधानी दिल्लीत याचा मोठा खुलासा झाला असून भारतातील गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार आयएसआयचे दोन दहशतवादी भारतात घुसले आहेत.

सुरक्षा यंत्रणांनी या दोन दहशतवाद्यांचे फोटो जारी केले असून त्यांचा तपास सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासह सर्व गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेत वाढ केली आहे. स्वतः जिल्हा अधीक्षक सर्व ठिकाणी फिरत असून सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. याचबरोबर गुजरातमधील कांडला विमानतळावर देखील कमांडो ट्रेनिंग दिलेल्या एका दहशतवाद्याला पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार या विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेत देखील वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने घेतलेल्या काश्मीर संदर्भातील निर्णयानंतर देशभरात दहशतवाद्यांकडून हल्ला होण्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून सर्व ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –