आजपासून ’या’ देशांसाठी भारतातून सुरू होणार आंतरराष्ट्रीय विमान सेवा !

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे मागील 90 दिवसांपासून बंद असलेली आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. याकरता फ्रान्स आणि अमेरिकेबरोबर एका द्विपक्षीय करारावर हस्ताक्षर करण्यात आले आहेत. यानुसार आता हे देश शुक्रवारपासून आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरू करू शकतात. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली आहे. असे करार काही दिवसात जर्मनीबरोबर देखील करण्यात येतील. म्हणजे जुलै किंवा ऑगस्टपर्यंत या देशांसाठी फ्लाइट्स सुरू होतील.

भारत आणि इंग्लंडदरम्यान दिल्ली-लंडन ही फ्लाइट दिवसातून दोन वेळा उड्डाण करणाार आहे. त्याचप्रकारे जर्मनीमधील लुप्थांसा एअरलाइनबरोबरची चर्चा शेवटच्या टप्प्यात आली आहे. भारताकडून फ्रान्स आणि अमेरिकेत एअर इंडियाची विमाने उड्डाण घेणार आहेत. 18 जुलैपासून एअर फ्रान्स दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि पॅरिसदरम्यान सेवा सुरू करणार आहे. अमेरिकेकडून युनायटेड एअरलाइन 18 आंतरराष्ट्रीय उड्डाणे 17 जुलै ते 31 जुलै दरम्यान सुरु करणार आहेत.

भारत सरकारने फ्रान्स आणि अमेरिकेबरोबर एक द्विपक्षीय करारावर हस्ताक्षर केले आहेत. यानुसार आजपासून हे देश आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करू शकणार आहेत. जगभरात कोरोना व्हायरसचे वाढते संक्रमण लक्षात घेता लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात देशातून आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद होती. 23 मार्चपासून देशात आंतरराष्ट्रीय उड्डाणं रोखण्यात आली होती. दोन महिन्यानंतर 25 मे पासून देशांतर्गत उड्डाणे सुरू करण्यात आली होती.