‘जर तुम्ही प्रत्येक समस्या हे एक आव्हान म्हणून स्वीकारले तर जगात काहीही अशक्य नाही : रिता शेटीया

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – “जर तुम्ही प्रत्येक समस्या हे एक आव्हान म्हणून स्वीकारले तर जगात काहीही अशक्य नाही. समस्या जेव्हा येतात त्या बरोबरच उपाय हि असतो , फक्त आपणास तो शोधता आला पाहिजे .” असे कार्यक्रमाच्या अध्यक्षा समाज सेविका रिता शेटीया महिला दिनानिमित्त आयोजित कार्य्रक्रमात म्हणाल्या.

फॅमिली प्लांनिंग असोसिएशन ऑफ इंडिया (गोरनं ग्रोस्कॉफ फॅमिली क्लिनिक) आणि स्त्री मुक्ती संघटना पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च २०२० रोजी जागतिक महिला दीना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

प्रतिकूल परिस्थिती असताना देखील ज्या महिला आणि मुलींनी जिद्दीने, स्वकष्टाने आणि हिमतीने उच्च शिक्षण स्वतः घेऊन, मुलांनाही उच्च शिक्षणासाठी प्रेरित करणाऱ्या महिला आणि मुलींचा सत्कार अनुक्रमे पायल फरगडे ,कृतिका कदम, साक्षी गायकवाड आणि रेश्मा ओव्हाळ यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या समाजसेविका रिता शेटीया यांच्या हस्ते करण्यात आला .

महिला दिनाचे औचित्य साधून फॅमिली प्लांनिंग अससोसिएशन ऑफ इंडिया (गोरनं ग्रोस्कॉफ फॅमिली क्लिनिक) पुणे यांनी सकाळी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते . ज्याचा उद्देश फॅमिली प्लांनिंग मधे स्त्री – पुरुष समानता आणण्यासाठी जनजागृती करणे आणि त्याचे महत्व सांगणे हे होते. तसेच यावेळी “महिला दिन माझ्या मनातील” या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करून पारितोषिक वितरण करण्यात आले.


यावेळी मुक्ता शिंगटे आणि त्यांच्या टीम ने बिनधास्त बोल , सब मिलकर घर को चलायेंगे आणि चिमणीचे गीत सादर केले .

यावेळी FPAI ब्रँच च्या कार्यकारी समिती सदस्या फ्रेनी तारापोर , FPAIच्या उपाध्यक्षा सुषमा किबे आणि चंदर खोसला, FPAIच्या सेक्रेटरी गीतांजली देशपांडे, सदस्य डॉ . अनुराधा पाटील, स्त्री मुक्ती संघटना पुणे अध्यक्षा डॉ. करुणा गोखले आणि सुप्रिया बेंडखळे उपस्थित होत्या.

अर्चना ससाणे यांनी सूत्रसंचालन, डॉ. नासेरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर योगिता वखारे यांनी आभार प्रदर्शन केले . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कर्मचारी वर्ग , सदस्य , समुपदेशक सगळ्यांनी विशेष प्रयत्न केले.