योग दिवस : योग केल्यानं दूर होतात ‘हे’ 5 रोग, लॉकडाऊनमध्ये फायदा दुप्पट

पोलीसनामा ऑनलाइन – अंतरराष्ट्रीय योग दिवस प्रत्येक वर्षी 21 जूनरोजी साजरा केला जातो. योग तुमचे शरीर आणि मन उर्जावान बनवते. सोबतच अनेक आजार यामुळे दूर होतात. कोरोना व्हायरससारखी गंभीर महामारी आणि त्यानिमित्त झालेल्या लॉकडाऊनमुळे याचे महत्व आणखी वाढले आहे. हेल्थ एक्सपर्टचे म्हणणे आहे की, लॉकडाऊनमध्ये बहुतांश लोकांचे फिजिकल वर्कआउट झिरो झाले आहे. या स्थितीत योग करणे तुमच्यासाठी खुप लाभदायक ठरू शकते.

योग केल्याने लठ्ठपणाशी संबंधीत रोगांपासून मुक्ती मिळते. नियमित योग केल्यास वाढलेले वजन कमी होते. मात्र, आहारावर सुद्धा नियंत्रण ठेवले पाहिजे. लठ्ठपणामुळे व्यक्तीला अनेक प्रकारच्या आजारांचा धोका असतो.

डायबिटीज असा आजार आहे त्याचा कोणताही ठोस उपचार नाही. तुम्ही इन्सुलिन प्रतिरोधाचा उपचार करू शकत नाही. परंतु, आपल्या ब्लड शुगरला कंट्रोल करू शकता. योगाच्या मदतीने बॉडीतील शुगर सहजपणे कंट्रोल करता येते. सीडीसीच्या रिपोर्टनुसार, कोरोनामुळे मरणार्‍यांमध्ये लठ्ठपणा आणि डायबिटीजचे रूग्ण जास्त आहेत.

अस्थमाच्या रूग्णांसाठी योग खुप लाभदायक आहे. योग केल्याने श्वासाच्या समस्येतून सुटका होते, शिवाय इन्हेलरचा वापर करण्याची गरज भासत नाही. योगामुळे फफ्फुसांमध्ये ताजी हवा पोहचते आणि श्वास घेण्याच्या सर्व समस्या दूर होतात. कोरोना काळात आपल्या फफ्फुसांचा बचाव करणे एक आव्हान झाले आहे. अशाावेळी योग तुम्हाला रेस्पिरेटरी डिसीजपासून दिलासा देऊ शकतो.

हायब्लड प्रेशरमुळे अनेक आजारांना सुरूवात होते. हायपरटेंशनचा आजार दूर करण्यासाठी योग खुप उपयोगी आहे. योग आणि ध्यानाच्या मदतीने हायपरटेंशन दूर करता येते.

एका विशिष्ट वयानंतर नेहमी लोकांना मायग्रेनची समस्या होऊ लागते. मायग्रेनचे मुख्य कारण मेंदूपर्यंत रक्ताचे योग्यप्रमाणात सर्क्युलेशन न होणे हे आहेत. योगाच्या मदतीने मेंदूपर्यंत रक्ताचा पुरवठा सहज करता येतो. मन तंदुरूस्त होते. मायग्रेनमध्ये शीर्षासन किंवा हेडस्टँड केल्याने सुद्धा लाभ मिळतो.