Intestine Cure | शरीराकडून वेळोवेळी मिळणारे काही संकेत दर्शवितात आपल्या आतड्यांची स्थिती, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Intestine Cure | जर अनेकदा पचनाशी संबंधित समस्यांचा (Digestive Problems) सामना करावा लागला, थकवा आला, वजनातही चढ-उतार होत राहिले तर ही बाब गांभीर्याने घ्या. ही चिन्हे थेट आतडे कमकुवत होण्याचे संकेत देतात. ज्याकडे दुर्लक्ष केल्याने नुकसान होऊ शकते. आतडे कमजोर होण्याची लक्षणे तसेच त्यांना बळकटी देण्याच्या उपाययोजनांविषयी जाणून घेऊ (Intestine Cure).

 

वजन कमी-जास्त करत रहा (Keep Weight Losing- Increasing) :
वजन वाढवायचे असेल किंवा वजन कमी करायचे असेल पण तसे करता येत नसेल तर ते आतडे कमकुवत होण्याचे लक्षण आहे. तुम्ही याकडे जितक्या लवकर लक्ष द्याल तितके चांगले होईल, अन्यथा इतर अनेक व्याधी उत्पन्न होऊ शकतात (Intestine Cure).

 

थकवा (Fatigue) :
चांगली झोप आणि सकस आहार घेतल्यानंतरही दिवसभर थकवा जाणवत राहिला तर ते आतड्यांचं काम नीट न होण्याचं लक्षण आहे. तीव्र थकवा असलेल्या व्यक्तींमध्ये, मायक्रोबायोममधील संतुलन बिघडू शकते. ज्या लोकांना थकवा, अशक्तपणा जाणवतो. ते चिडचिडे होतात. शिवाय पचनक्रियेवर थेट परिणाम होतो.

 

त्वचेची जळजळ (Skin Inflammation) :
एक्जिमा, सोरायसिस आणि मुरुमांची समस्या देखील कमकुवत आतड्यांचे लक्षण आहे. आतडे मायक्रोबायोम कॉम्प्लेक्स रोगप्रतिकारक शक्तीद्वारे त्वचेवर परिणाम करते. एवढेच नव्हे तर त्वचेची अ‍ॅलर्जी, फूड अ‍ॅलर्जी आणि श्वसनाची अ‍ॅलर्जीही यामुळं होते.

आतड्यांना मजबूत बनवा (Strengthen The Intestines) :

आहाराकडे प्रथम लक्ष देणे गरजेचे आहे. आवश्यक फळे, हिरव्या भाज्यांचा समावेश . फास्ट, जंक फूडपासून दूर राहा.

ताण, चिंता यापासून शक्यतो दूर राहा. यासाठी तुम्ही मेडिटेशनचा आधार घेऊ शकता.

प्रौढ व्यक्तींनी ७ ते ८ तासांची झोप घेणे गरजेचे.

कोणत्याही प्रकारचे धूम्रपान करू नये.

शक्य तितका फायबरयुक्त आहार घ्या.

जेवल्यानंतर थोडा वेळ चांगला फेरफटका मारा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Intestine Cure | intestine cure these body signals tell the condition of your intestines know about them

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Summer Health Tips | जाणून घ्या उन्हाळ्यात नाकातून रक्तस्त्राव होण्याची कारणे, परिणाम आणि प्रतिबंध उपाय

 

Bad Habits For Ear Health | ‘या’ 4 सवयींमुळे तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवर होऊ शकतो परिणाम; ‘या’ पध्दतीच्या चूका करण्यासाठी राहा दूर, जाणून घ्या

 

Symptoms Of Heart Attack | हार्ट अटॅकच्या आधी शरीरात ‘या’ पध्दतीच्या समस्या उद्भवतात; ‘या’ लक्षांवर लक्ष ठेवून करू शकतो बचाव, जाणून घ्या