‘कॉफी विथ करण’ऐवजी ‘कॉफी विथ NCB’ : मनजिंदरसिंग सिरसा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनजिंदरसिंग सिरसा यांनी बॉलीवूडचा निर्माता ,दिग्दर्शक कारण जोहर याच्या ड्रग्स पार्टी प्रकरणी एनसीबीकडे तक्रार केली होती. ती नंतर मुंबई एनसीबीकडे वर्ग करण्यात आली. याची चौकशी करण्यात येत असून यात अनेक सेलेब्रिटी सामील आहेत. मंगळवारी सिरसा यांनी एनसीबीचे प्रमुख राकेश अस्थाना यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी ३० जुलै रोजी २०१९ मध्ये झालेल्या ड्रग्स पार्टीच्या आयोजनाचा आरोप केला आहे. या तक्रारीमध्ये करण जोहर, मलायका अरोरा, विकी कौशल, दीपिका पदुकोण, अर्जुन कपुर, वरून धवन, शाहिद कपूर यांचा समावेश आहे. यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत तक्रार करण्यात आली आहे. आता ती मुंबई एनसीबीकडे वर्ग करण्यात आली आहे. गरज पडल्यास या कलाकारानां चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. या दरम्यान विकी कौशल याने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

कॉफी विथ एनसीबी

करण जोहर याचा प्रसिद्ध कार्यक्रम ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाचा आधार घेत ते लवकरच कॉफी विथ एनसीबी होईल. जिकडे करणची अनेक रहस्य उघडकीस येतील. असे ट्विट गुरुवारी आमदार मनजिंदरसिंग सिरसा यांच्याकडून करण्यात आले. आणि त्यामध्ये सर्व बॉलीवूड स्टार्सना टॅग केले.

मुंबई पोलिसांनी दुर्लक्ष केले

या पार्टीबद्दल मुंबई पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र पोलिसांकडून दुर्लक्ष करण्यात आले होते. तेव्हा जर लक्ष दिले असते तर आज बॉलीवूडमधील ड्रग्स कनेक्शनला ब्रेक बसला असता. किमान आता तरी याची चौकशी करण्यात येईल अशी आशा व्यक्त करत आहे असे सिरसा यांच्याकडून आरोप करण्यात येत आहे.