पी. चिदंबरम यांचा सीबीआय कोठडीतील मुक्‍काम वाढला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीत दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टाने 2 सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे.

चिदंबरम यांना दिल्लीमधील रोऊज ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सीबीआयकडून आणखी पाच दिवसांची कोठडी मागण्यात आली. सीबीआयच्या या मागणीने न्यायाधीश चांगलेच संतापले. ते म्हणाले, की आपण पहिल्यांदाच 15 दिवस कोठडी का मागितली नाही? आपण दररोज त्यांना किती प्रश्न विचारत असता? यावेळी सीबीआयने आम्ही चिदंबरम यांची 8 ते 10 तास चौकशी करत असल्याचे सांगितले.

यावर न्यायाधीशांनी सीबीआयला विचारले की जर रोज 10 तास चौकशी करत असता, तर माझ्यासमोर इतकी कमी कागदपत्रे का सादर करत आहात? दरम्यान, सीबीआय न्ययालयाकडून त्यांना चिदंबरम यांची 2 सप्टेंबरपर्यत कोठडी वाढवण्यात आली आहे. सीबीआयने कोर्टात सांगितले की दुसऱ्यांदा रिमांड वाढविण्यात आल्याने अनेक महत्त्वाचे खुलासे होऊ शकतात. कोठडीदरम्यान चिदंबरम यांची अनेक प्रकरणांमध्ये चौकशी केली जात आहे. सीबीआय या प्रकरणाच्या सविस्तर चौकशीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

चिदंबरम यांच्या वकिलांनी स्वतः कोर्टाला सांगितले की 2 सप्टेंबर पर्यंत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत चिदंबरम यांना सीबीआय कोठडीत रहायचे आहे. कोर्टाने म्हटले आहे की सीबीआयची या प्रकरणाची कस्टर्डियल चौकशी करण्याची मागणी न्याय्य आहे, त्यामुळे सीबीआयला सोमवारपर्यंत कोठडी देण्यात येत आहे.

चिदंबरम यांना सीबीआयने 21 ऑगस्टला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआय न्यायालयाकडून त्यांना 4 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या सीबीआय कोठडीत 30 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली होती. आता 5 सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी वाढवण्यात आली आहे. आता सर्वोच्च न्यायालय 5 सप्टेंबरला चिदंबरम यांच्या अग्रीम जामीन अर्जावर निकाल देईल.

आरोग्यविषयक वृत्त –