सुपरओव्हरमध्ये दिल्लीची बाजी, पंजाबच्या मयांकची खेळी व्यर्थ

पोलिसनामा ऑनलाईन टीम – दुबईच्या मैदानात रंगलेल्या दुसर्‍या आयपीएल सामन्यात सुपरओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात केली आहे. विजयासाठी अवघ्या 3 धावांचे आव्हान मिळालेल्या दिल्लीने सहज लक्ष्य पूर्ण करत विजय संपादन केला. निर्धारित वेळेत पंजाबकडून धडाकेबाज खेळी करणार्‍या मयांक अग्रवालला सुपरओव्हरमध्ये संधी न दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

कगिसो रबाडाने सुपरओव्हरमध्ये अवघ्या 2 धावा देत 2 बळी घेतले. ऋषभ पंतने विजयासाठी दिलेले आव्हान सहज पूर्ण करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी रंगलेला सामना बरोबरीत सुटला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्लीने भेदक मारा करत पंजाबला 157 धावांत रोखले. मयांक अग्रवालने 89 धावांची बहारदार खेळी करत पंजाबला विजयाच् जवळ आणले होते.

परंतू स्टॉयनिसने अखेरच्या षटकात दोन बळी घेत सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. स्टॉयनिसने फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही अखेरच्या क्षणापर्यंत हार न मानता संघाचे आव्हान कायम राखले. पंजाबकडून मधल्या फळीतल्या फलंदाजांनी पुरती निराशा केल्यामुळे मधल्या षटकांमध्ये आवश्यक गतीने धावा झाल्या नाहीत. दिल्लीकडून पहिल्या डावात रबाडा-आश्विन आणि स्टॉयनिस या त्रिकुटाने प्रत्येकी 2-2 बळी घेतले. मोहीत शर्मा आणि अक्षर पटेलने 1-1 बळी घेतला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like