IPL 2021 | पिंपरी-चिंचवडच्या ऋतुराजनं केली ‘दमदार’ खेळी; मुंबई समोर विजयासाठी 157 धावांचे ‘आव्हान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – IPL 2021 | आयपीएलच्या 14 व्या पर्वाच्या दुसर्‍या टप्प्यात आज पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज संघाने (Chennai Super Kings) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians – IPL 2021) संघासमोर विजयासाठी 157 धावांचे आव्हान ठेवले. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी जोरदार सुरुवात केली होती. चेन्नईचे चार फलंदाज तंबूत दाखल झाले होते. अशा परिस्थितीत पिंपरी-चिंचवडच्या मराठमोळ्या ऋतूराजने अखेरच्या षटकांत दमदार खेळी करत संघाला 157 धावांपर्यंत नेले.

ऋतूराजने 4 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 88 धावांची आयपीएलमधील त्याची वैयक्तिक सर्वोत्तम खेळी केली. नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम फलंदाजी घेतली होती. ट्रेंट बोल्टने (Trent Boult) पहिल्या षटकात फॅफ ड्यू प्लेसिस (Faf du Plessis) यास बाद केले. यानंतर अ‍ॅडम मिलने याने मोइन अली (Moeen Ali) यास झेलबाद करुन मुंबईची बाजू मजबूत केली.

यांतर चेन्नईचा अंबाती रायुडू मिलनेच्या बाऊन्सवर दुखापतग्रस्त झाल्याने तंबूत परतला. त्यामुळे चेन्नईच्या फॅफ ड्यू प्लेसिस, मोइन अली आणि रायुडू यांना खातेही उघडता आले नाही. दरम्यान सुरेश रैना (Suresh Raina) (4) जोराचा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. बोल्टने रैनाला बाद केले.

सामन्याच्या चौथ्याच षटकात महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) फलंदाजीसाठी आला.
त्याने सावध खेळी करण्याचा प्रयत्न केला, परंतु अ‍ॅडम मिलनेच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला.
बोल्टने त्याला झेलबाद केले.

चेन्नईचा संघ (IPL 2021) अडचणीत आला असतानाही अशा स्थितीत ऋतूराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) विकेट संयमी खेळी सुरू केली.
अखेरच्या 5 षटकांत ऋतूराजने आक्रमक खेळी करत संघाची बाजू मजबूत केली.
ड्वेन ब्रावोनेही (Dwayne Bravo) त्यास साथ देत 8 चेंडूत 23 धावांची खेळी केली.

Web Titel :- IPL 2021 | Pune pimpri chinchwads rituraj gaikwad fights 157 run challenge for victory against mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Symptoms Of Urination | यूरीनेशनसंबंधी ‘ही’ 5 लक्षणे अतिशय घातक, पुरुषांनी करू नये दुर्लक्ष

High BP | डायबिटीजपासून हाय BP पर्यंत तूपात ‘या’ 5 वस्तू मिसळून खाल्ल्याने दूर होतील अनेक आजार; जाणून घ्या

Section 144 In Kolhapur | किरीट सोमय्यांचा कोल्हापूर दौरा ! जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश