Section 144 In Kolhapur | किरीट सोमय्यांचा कोल्हापूर दौरा ! जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – section 144 in kolhapur | भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना कोल्हापूर जिल्हाधिकारी (Collector) यांनी नोटीस बजावून त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये असे सांगितले आहे. मात्र, किरीट सोमय्या यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावून लावत कोल्हापूरच्या रवाना झाले आहेत. किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दोऱ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार (Rahul Rekhawar) यांनी जिल्ह्यात दोन दिवस जमावबंदी आदेश लागू (section 144 in kolhapur) केला आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप (Allegations of corruption) केले आहेत. याचे कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. शनिवारी कागल आणि कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीमध्ये सोमय्या यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. तसेच बैठकीमध्ये सोमय्या हे कोल्हापूर जिल्ह्यात येवू नयेत, ते कोल्हापूर जिल्ह्यात आल्यानंतर त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतील, असे आव्हान देण्यात आले आहे.

किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे.
यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी सोमवार (दि.20) पहाटे पाच ते मंगळवार (दि.21) रात्री बारा पर्यंत जिल्ह्यात जमावबंदी आदेश (Section 144 In Kolhapur) लागू केला आहे.
या दरम्यान पाच किंवा पाच व्यक्तींना एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली आहेत.
याचे उल्लंघन करणाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Titel :- Section 144 In Kolhapur | Kirit Somaiya’s visit to Kolhapur! District Collector orders curfew in the district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Washim Crime | वृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने सपासप वार करुन हत्या, भरदिवसा घडलेल्या प्रकारने वाशिममध्ये खळबळ

Chandrakant Patil | भाजपा किरीट सोमय्या यांच्या पाठीशी, त्यांचा आवाज दडपता येणार नाही; चंद्रकांत पाटील यांचा इशारा

Delhi-Mumbai Expressway | दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे मधून केंद्राला दरमहा मिळेल 1,000 ते 1,500 कोटी रुपयांचा टोल महसूल – नितीन गडकरी