IPS Rajnish seth – MPSC Chairman | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (MPSC) मिळाले अध्यक्ष; राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्याकडे पदभार; नवीन DGP कोण?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – IPS Rajnish seth – MPSC Chairman | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) अध्यक्ष किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर हे सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद मागील काही महिन्यांपासून रिकामे होते. अखेर राज्य सरकारने MPSC च्या अध्यक्षपदी नवीन नियुक्ती केली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची MPSC च्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांची राज्याचे पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर, आता त्यांच्याकडे MPSC ची नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. नवीन अध्यक्षांच्या नियुक्तीचा निर्णय एकनाथ शिंदे लवकरच घेणार असून रजनीश सेठ हे एमपीएससीचे नवीन अध्यक्ष होऊ शकतात. (IPS Rajnish seth – MPSC Chairman)

एमपीएससीचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर हे बुधवारी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे हे पद रिक्त झाले आहे. त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया आधाच सुरु झाली होती. यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. तेव्हा रजनीश सेठ यांनी या पदासाठी अर्ज केला होता. मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आलेल्या अर्जांची छाणणी करुन तीन नावांची यादी मुख्यमंत्र्यांकडे पाठवली. या यादिमध्ये रजनीश सेठ, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आणि वन सेवेतील ज्येष्ठ निवृत्त अधिकारी प्रदीपकुमार यांचा समावेश आहे. या तिघांमध्ये रजनीश सेठ यांचे नाव आघाडीवर होते. अखेर रजनीश सेठ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. (IPS Rajnish seth – MPSC Chairman)

एमपीएससी आयोगासाठी पूर्णवेळ अध्यक्ष नव्हते. आयोगावर पूर्णवेळ अध्यक्ष नेमण्यात यावा अशी मागणी वारंवार
करण्यात येत होती. त्यानंतर राज्य सरकारने किशोर राजे निंबाळकर यांची नोव्हेंबर 2021 मध्ये अध्यक्षपदावर
नियुक्ती केली होती. त्यानुसार त्यांचा कार्यकाळ हा पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून सहा वर्षासाठी किंवा वयाची 62
वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी निश्चित करण्यात आला होता. त्यावेळचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढलेल्या अधिसूचनेत तसे नमूद करण्यात आले होते. किशोर दत्तात्रय राजे निंबाळकर हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) निवृत्त अधिकारी होते.

नवीन महासंचालक कोण?

सध्याचे पोलीस महासंचालक असलेले रजनीश सेठ यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने राज्याचे नवे
पोलीस महासंचालक कोण होणार याचीही चर्चा रंगली आहे. सध्या केंद्र सरकारच्या सेवेत
(महासंचालक इंडो-तिबेट सीमा पोलीस) असलेल्या रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांना संधी मिळू शकते.
रजनीश सेठ हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. याच बॅचच्या रश्मी शुक्ला या एकच अधिकारी आहेत.
जून 2024 मध्ये त्या सेवानिवृत्त होणार आहेत. या निमित्ताने राज्य पोलील दलात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raj Thackeray | ‘तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य व्हेंटिलेटरवर, नांदेड घटनेवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारवर टीकास्त्र

Pune Crime News | पुर्ववैमनस्यातून नाना पेठेत भरदिवसा दोघांवर खुनी हल्ला; एकाची प्रकृती चिंताजनक, प्रचंड खळबळ

Pune Crime News | ससून हॉस्पीटलच्या वॉर्ड नं. 16 मधून आरोपीचे पलायन, प्रचंड खळबळ

Aaditya Thackeray On Nanded-Sambhajinagar Patients Death Incident | हे सगळं भयानक… शासकीय रुग्णालय हा मृत्यूचा सापळा बनलाय?, नांदेड, संभाजीनगरच्या घटनांवर आदित्य ठाकरेंचा संताप