Aaditya Thackeray On Nanded-Sambhajinagar Patients Death Incident | हे सगळं भयानक… शासकीय रुग्णालय हा मृत्यूचा सापळा बनलाय?, नांदेड, संभाजीनगरच्या घटनांवर आदित्य ठाकरेंचा संताप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Aaditya Thackeray On Nanded-Sambhajinagar Patients Death Incident | आधी नांदेड आणि मग छत्रपती संभाजीनगरमध्ये 24 तासांत मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा हादरवणारा आहे. महत्त्वाचं म्हणजे, यामध्ये सर्वाधिक प्रमाण नवजात बालकांचं आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण राज्य हादरुन गेलं आहे. यावरुन विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच प्रकरणी मुख्यमंत्र्यांसह, आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे. अशातच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. शासकीय रुग्णालय हा मृत्यूचा सापळा बनलाय का? असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. (Aaditya Thackeray On Nanded-Sambhajinagar Patients Death Incident)

माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, कालच नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचं थैमान झाल्याची भीषण घटना घडली असताना, आज तसाच भयानक प्रकार छत्रपती संभाजीनगर मधल्या घाटी रुग्णालयात (Ghati Hospital Sambhajinagar) घडल्याचं समोर येतंय. २ बालकांसह ८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नांदेडच्या रुग्णालयातही अजून ७ मृत्यू झाल्याचं समजतंय. हे सगळं भयानक आहे. (Aaditya Thackeray On Nanded-Sambhajinagar Patients Death Incident)

शासकीय रुग्णालय हा मृत्यूचा सापळा बनलाय का अशी शंका येतेय. महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्था ह्या भ्रष्ट
मिंधे-भाजपा सरकारच्या काळात कोलमडून गेल्याचं ढळढळीतपणे दिसतंय. लोकांच्या जीवाची ह्यांना पर्वा नाही, परिस्थितीचं गांभीर्य नाही… अश्यांना सत्तेच्या खुर्चीत बसून महाराष्ट्र सांभाळण्याचा हक्कच नाही!

दरम्यान, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येतील शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूची केंद्र सरकारकडून दाखल घेण्यात आली आहे.
सदर घटनेप्रकरणी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी रुग्णालय प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

https://x.com/AUThackeray/status/1709096283821285499?s=20

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raj Thackeray | ‘तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य व्हेंटिलेटरवर, नांदेड घटनेवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारवर टीकास्त्र

Pune Navale Bridge Accident | नवले पुलाजवळ अपघात ! मोटारीच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

Debu Rajan Khan Suicide | लेखक राजन खान यांच्या अभियंता मुलाने उचलले टोकाचं पाऊल, राहत्या घरात एकटा असताना संपवलं आयुष्य

Pune Crime News | म्हाळुंगे : कंपनीचे गेट लवकर उघडले नाही म्हणून बेशुद्ध पडेपर्यंत सिक्युरिटी गार्डला मारहाण