IPS Rashmi Shukla | तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुल्का यांची कोरेगाव भीमा आयोगापुढे होणार साक्ष

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – IPS Rashmi Shukla | कोरेगाव भीमा येथील दंगलीबाबत नेमण्यात आलेल्या आयोगासमोर (Koregaon Bhima Commission) पुणे शहर पोलीस दलाच्या (Pune City Police) तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुल्का (IPS Rashmi Shukla) यांची साक्ष होणार आहे.

कोरेगाव भीमा आयोगाने या आठवड्यातील साक्षीपुराव्याबाबतचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

त्यानुसार कोरेगाव भीमा दंगल (Bhima Koregaon Violence) झाली, त्यावेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक असलेले सुवेझ हक (Suvez Haque IPS) यांची १३ व १४ सप्टेबर रोजी साक्ष होणार आहे. त्यानंतर तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांची १४ व १५ सप्टेबर रोजी साक्ष होणार आहे. त्यानंतर तत्कालीन पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम (IPS Ravindra Kadam) यांची १५ सप्टेबर रोजी साक्ष होणार आहे.

वंचितचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांची साक्ष नुकतीच घेण्यात आली होती. त्यांची उर्वरित साक्ष होणार आहे.

रश्मी शुक्ला या पुणे पोलीस आयुक्त (Pune Police Commissioner)
असताना त्यांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांचे टेलिफोन टॅपिंग (Maharashtra Phone Tapping Case)
केल्याप्रकरणी महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government)
काळात गुन्हा दाखल झाला होता. सरकार बदलल्यानंतर त्यांना आता त्यात दिलासा मिळाला आहे.
या घटनेनंतर त्या प्रथमच साक्षीनिमित्त पुण्यात येण्याची शक्यता आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

01 September Rashifal : मिथुन, कर्क आणि सिंह राशीच्या जातकांना होणार धनलाभ, मिळेल नशीबाची साथ

Rules Changed From 1 September 2023 | १ सप्टेंबरपासून बदलले हे नियम, आयपीओपासून क्रेडिट कार्डपर्यंतच्या नियमात झाला बदल

Bank Holidays in September 2023 | जन्माष्टमी ते गणेश चतुर्थीमुळे बँका अनेक दिवस राहतील बंद, पहा सप्टेंबरमध्ये १७ दिवसांची सुट्टीची यादी

Pune Crime News | पांगरमल दारुकांडमधील मुख्य आरोपी शिवसेनेच्या फरारी जि. प. सदस्य म्हाळुंगेतील कंपनीत सेल्स एक्झिक्युटीव्ह