IPS Success Story : कधीकाळी स्टेशनवर रेल्वे रूळाच्या देखभालीचं काम करायचा ‘हा’ गरीब मुलगा, आज बनला IPS अधिकारी

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – राजस्थानात एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा आयएएस अधिकारी आहे. तो स्वतःच्या मेहनतीने इथपर्यंत पोहोचला आहे. या गरीब शेतकऱ्याचा मुलगा रेल्वे स्थानकावर ट्रॅक दुरुस्तीचे काम करायचा. आजच्या सक्सेस स्टोरी मध्ये आपण राजस्थानच्या प्रल्हाद मीना यांची यशोगाथा जाणून घेणार आहोत. कसे रेल्वेमध्ये गॅंगमॅनची छोटीशी नोकरी करतांना प्रह्लाद मीना आयपीएस अधिकारी झाले.

प्रल्हाद यांनी सांगितले की आमच्याकडे दोन बीघा जमीन होती, ज्यामध्ये घर चालविणे अत्यंत कठीण होते, तेव्हा आई व वडील दुसऱ्यांचे शेत वाट्याने घेऊन कुटुंब चालवत असत. आमच्या भागात शिक्षणाविषयी जनजागृतीचा मोठा अभाव होता. मी वर्गात नेहमीच प्रथम येणारा विद्यार्थी होतो, परंतु मी अशा पदावर काम करेल याचा स्वप्नात देखील विचार केला नव्हता. मी सरकारी स्कूलमधून बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. माझा दहावीचा निकाल लागला तेव्हा मी शाळेतून प्रथम आलो होतो. यानंतर माझी देखील इच्छा होती आणि बरेच लोक देखील म्हणाले की मी विज्ञान विषयात पुढील शिक्षण घ्यावे. या काळात मी इंजिनियर होण्याचे स्वप्न पाहायचो, परंतु कुटुंबाची परिस्थिती अशी नव्हती की ते मला बाहेर शिकवू शकतील.

माझ्या गावाच्या आजूबाजूला विज्ञान शाखेचे कोणतेही कॉलेज नव्हते. मी सर्व गोष्टी विसरलो आणि 11 वी साठी सरकारी स्कूलमध्येच प्रवेश घेतला आणि मानविकी विषयात अभ्यास केला. अगदी बारावीतही मी माझ्या वर्गात आणि स्कूलमध्ये प्रथम आलो, पण आता माझी प्राथमिकता बदलली होती, आता मला आधी नोकरी हवी होती, कारण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नव्हती की ते मला जयपुरला भाड्याच्या खोलीत राहण्यासाठी पैसे पुरवू शकतील. प्रल्हाद यांनी सांगितले की जेव्हा मी बारावीत होतो तेव्हा आमच्या गावातल्या एका मुलाची भारतीय रेल्वेच्या ग्रुप डी (गँगमन) मध्ये निवड झाली होती. त्यावेळी मीसुद्धा गॅंगमन होण्याचे माझे लक्ष्य केले आणि तयारी सुरू केली. बीए द्वितीय वर्ष 2008 मध्ये मी भारतीय रेल्वेच्या भुवनेश्वर बोर्डाकडून गँगमन म्हणून निवडण्यात आलो.

तसेच ते म्हणाले की, मी कर्मचारी निवड आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या संयुक्त पदवीधर स्तरीय परीक्षा दिली आणि त्यामध्ये मला रेल्वे मंत्रालयात सहाय्यक विभाग अधिकारी पद मिळाले. आता दिल्लीहून मी घराच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत होतो आणि त्यासह मी नागरी सेवा परीक्षेची तयारी देखील सुरू केली होती.

रामगड पचवारा तहसीलच्या आभानेरी गावात राहणाऱ्या प्रल्हाद यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत 951वी रँक (जनरल) मिळवली आहे. प्रल्हाद मीना यांना 2013 आणि 2014 मध्ये मुख्य परीक्षा देण्याची संधी मिळाली. 2015 मध्ये प्राथमिक परीक्षेत यश मिळालं नाही, त्यानंतर त्यांनी हिंदी साहित्य विषयाची चांगली तयारी केली आणि 2016 मध्ये नागरी सेवा परीक्षेत त्यांनी यश मिळवलं आणि ते सध्या भारतीय पोलिस सेवा- IPS मध्ये ओडिशा कॅडरचे 2017 बॅचचे अधिकारी आहेत.

प्रल्हाद म्हणाले की, एकदा सिव्हिल सर्व्हिस परीक्षा पास करुन जगाला दाखवून द्यायचे होते की मीसुद्धा हे करू शकतो. माझ्यासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या मुलांना माझ्या यशाने आत्मविश्वास मिळेल आणि तेही सिव्हिल सर्व्हिस मध्ये जाऊन अधिकारी होऊ शकतील.