Corona Virus : इराणमध्ये कोरोनामुळं अनेकांचा मृत्यू, धार्मिक स्थळांवर दरवाजे ‘चाटत’ असताना दिसले लोक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीननंतर कोरोना विषाणूमुळे कोणत्या देशाला सर्वाधिक त्रास झाला असेल तर ते इराण आहे. एक वृत्तसमूहाच्या वृत्तानुसार, इराणमध्ये 210 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु इराण सरकार कोरोना विषाणूशी संबंधित बातम्या लपवत असल्याचा आरोप होत आहे आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी पुरेशी पावले उचलली जात नाहीत. असे देखील म्हंटले जात आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, इराणच्या धार्मिक स्थळांवर दरवाजे चाटणाऱ्या लोकांचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, जे चिंताजनक परिस्थिती दर्शवितात. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओबाबत सामान्य लोक सरळ सरळ म्हणतात की , त्यांना अजिबात फरक पडत नाही की यामुळे काय परिणाम (इंफेक्शन) होईल.

इराणमध्ये शाळा, विद्यापीठ व क्रीडा केंद्रे बंद करण्यात आली असून लोकांना सार्वजनिक जागी जाण्याचे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतु, सर्वात जास्त त्रास झालेल्या शहरात धार्मिक स्थळे बंद केलेली नाहीत.

नुकत्याच झालेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की कोरोना विषाणू मानवी शरीराबाहेर 9 दिवस जिवंत राहू शकतो. हे जर्नल ऑफ हॉस्पिटल इन्फेक्शनच्या 22 अभ्यासांच्या विश्लेषणाच्या आधारे असे म्हटले गेले आहे.

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस असे म्हणताना ऐकू येतो की ‘कोरोना विषाणूमुळे लोकांना घाबरू नका.’ हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या पत्रकार क्रिस्ट अललाइनजेड यांनी लिहिले आहे की, सरकार धार्मिक स्थळे उघडी ठेवून इराण आणि जगभरातील लोकांचे जीव धोक्यात घालवित आहेत.