दुप्पट किंमतीवर झाली IRCTC च्या शेअर्सची ‘लिस्टिंग’, गुंतवणूकदार झाले ‘मालामाल’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वेची सहयोगी कंपनी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिज्म कॉरपोरेशन म्हणजेच IRCTC ने सार्वजनिक क्षेत्रात उतरण्याचे ठरवले होते. यासाठी त्यांनी विक्री केलेल्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून शेअर मार्केटमध्ये या शेअर्सची किंमत मोठ्या प्रमाणत वाढली असून आज याची किंमत 691 रुपयांपर्यंत गेली आहे. यासाठी कंपनीने आपले IPO सुरु केले होते. या योजनेमध्ये रेल्वेला मोठा प्रतिसाद देखील मिळाला होता. सरकारने या शेअर्स विक्रीमधून 635-645 कोटी रुपये गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र अपेक्षेपेक्षा जास्त बोली लागल्याने रेल्वेला यातून मोठा फायदा झाला आहे.

किती रक्कम गोळा करण्याचे होते उद्दिष्ट
यामध्ये या IPO च्या एका बँडची किंमत हि 315-320 रुपये ठेवण्यात आली होती. कमीतकमी 40 शेअर्सवर तुम्हाला बोली लावण्यात येणार होती. रिटेलमध्ये शेअर्स घेणाऱ्या आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रत्येक शेअर्समध्ये 10 रुपयांची सूट देखील मिळाली होती. सरकारने या शेअर्स विक्रीमधून 635-645 कोटी रुपये गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.

किती जणांनी घेतले होते शेअर्स
सरकार 10 रुपये किमतीच्या 2 कोटी 1 लाख 60 हजार शेअर्सच्या विक्रीसाठी अर्ज मागवले होते मात्र प्रत्यक्षात 225.39 कोटी शेअर्ससाठी अर्ज आले होते. सध्या इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिज्म कॉरपोरेशन म्हणजेच IRCTC मध्ये सरकारची 100 टक्के भागीदारी होती मात्र या शेअर्सच्या माध्यमातून सरकारने 12.6 टक्के भागीदारी केली आहे. IRCTC ची स्थापना 27 सप्टेंबर1999 ला झाली होती. भारतीय रेल्वेची उपकंपनी आयआरसीटीसी हि एक मोठी कंपनी असून इंटरनेट तिकीट, खाद्यसेवा, रेल्वे पर्यटन आणि विक्री क्षेत्रात प्रामुख्याने काम करते.

Visit : Policenama.com