खुशखबर ! दिवाळीला घरी जाण्यासाठी विना पैसे देता बुक करा रेल्वेचे तिकीट, IRCTC ची खास ऑफर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिवाळी आणि छटपूजेच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवास करताना तिकीट काढण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील तरी काळजी करण्याची गरज नाही. तिकीटाचे पैसे तुम्ही 14 दिवसांनंतर देखील भरू शकता. यासाठी आयआरसीटीसीने अर्थशास्त्र प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा पायलट प्रोजेक्ट ई-पे लेटर बरोबर करार केला आहे. या माध्यमातून प्रवासी तिकीट घेतल्यानंतर 14 दिवसांनी याचे पैसे भरू शकतात.

अशी आहे प्रक्रिया –

तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीच्या अकाउंटवर लॉगइन करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला जे तिकीट बुक करायचे आहे त्यासंबंधी माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर बुक या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमची माहिती आणि कॅप्चा टाकल्यानंतर पुढील पेजवर जाता येईल. मात्र या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ePayLater या ऍपवर देखील रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्या समोर पैसे भरण्याचा पर्याय येईल. यामध्ये तुम्ही योग्य पर्याय निवडल्यास तुम्हाला तिकीट लगेच मिळेल. त्यानंतर ओपन होणाऱ्या नवीन पेजवर तुम्ही पैसे भरण्यासाठी काही माहिती द्यायची  आहे.

यामध्ये तुम्हाला विविध पर्याय मिळतील. तुम्हाला त्यावरील ePayLater या पर्यायावर क्लिक करायचे आहे. मात्र यासाठी तिकीटाची रक्कम हि एका विशिष्ट मर्यादेतच असावी. तसेच वेळेवर हि रक्कम देखील परत करावी लागणार आहे. जर तुम्ही वेळेवर पैसे दिले नाहीत तर तुमचे क्रेडिट कमी होणार असून तुम्हाला नंतर या सेवेचा लाभ घेता येणार नाही. त्यानंतर देखील तुम्ही पैसे भरले नाहीत तर तुमचे आयआरसीटीसीचे अकाउंट बंद केले जाईल.

काय आहे IRCTC ची ePayLater सर्व्हिस –
या सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना कोणतेही पैसे न भरता ऑनलाईन तिकीट घेता येणार आहे. मात्र 14 दिवसांच्या आत त्याचे पैसे भरावे लागणार आहेत. त्याचबरोबर या सेवेवर साडेतीन टक्के सर्व्हिस चार्ज देखील द्यावा लागणार आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी