पाकिस्तान लष्करावर टीका करणाऱ्या ‘त्या’ पत्रकाराची खंजीरने ‘भोसकून’ हत्या

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे शक्तिशाली लष्कर आणि देशाची गुप्तचर संघटना आयएसआयवर टीका करणारा ब्लॉगर व मुक्त पत्रकार मोहम्मद बिलाल खान (२२) याची खंजीरने भोसकून हत्या केली. बिलाल खानला टिष्ट्वटरवर १६ हजार, युट्यूब चॅनलवर ४८ हजार, तर फेसबुकवर २२ हजार फॉलोअर्स होते.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, बिलाल खान मित्रासोबत असताना त्याला फोन आला व एक जण त्याला जवळच्या जंगलात घेऊन गेला. तेथे त्याच्या पोटात खंजीर खुपसून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेत त्याचा मित्रही गंभीररित्या जखमी झाला आहे.

याबाबत पोलीस अधीक्षक सद्दार मलिक नईम यांनी सांगितले की, खान याला मारण्यासाठी खंजीरचा उपयोग संशयिताने केला. काही लोकांनी बंदुकीच्या गोळीचाही आवाज ऐकल्याचे सांगितले. या घटनेत खान याचा मित्रही गंभीररीत्या जखमी झाला आहे.

बिलाल खान हा सोशल मिडियावर जेवढा सक्रिय कार्यकर्ता होता तेवढाच तो मुक्त पत्रकार म्हणूनही प्रसिद्ध होता. त्याची हत्या झाल्यानंतर न्याय मिळण्यासाठी लगेचच सोशल मिडियावर मोहीम सुरू करण्यात आली. अनेक टिष्ट्वटर यूजर्सनी बिलाल खान याची हत्या ही त्याने पाकिस्तानी लष्कर आणि इंटर सर्व्हिस इंटेलिजन्सवर केलेल्या टीकेचा परिणाम असल्याचे म्हटले. या घटनेमुळे लोकांमध्ये भीती निर्माण केल्याचे बिलाल खानच्या वडिलांनी म्हटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

बेलाच्या पानात लपलय लोकसंख्या रोखण्याचं ‘गुपित’ ; ‘कॅन्सर’ आणि ‘लिव्हर’ साठी देखील फायदाच 

#YogaDay2019 : उंची वाढविण्यासाठी करा ‘ताडासन’ 

“संधिवात” बरा करायचा असेल तर पाळा हे पथ्य 

पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचे असेल तर ‘फळे’ खाण्यापूर्वी हे करा 

You might also like