Coronavirus : इस्त्रायलनं भारताच्या 4 तंत्रज्ञानावर सुरू केली ‘ट्रायल’, फक्त 30 सेकंदात मिळणार कोरोनाचा ‘रिपोर्ट’ !

नवी दिल्ली : भारतासोबत मिळून कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी रॅपिड टेस्ट किट विकसित करत असलेल्या इस्त्रायली शास्त्रज्ञांच्या एका टीमने राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये ट्रायल सुरू केली आहे. ट्रायल यशस्वी झाली तर अवघ्या 30 सेकंदात कोरोनाचा रिपोर्ट मिळू शकतो. इस्त्रायलचे शास्त्रज्ञ 30 सेकंदात कोरोना व्हायरस संसर्गाचा शोध घेण्यासाठी राम मनोहर लोहिया मध्ये 4 तंत्रांचे मूल्यांकन करत आहेत.

कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा शोध घेणार्‍या या नवीन पद्धतीच्या ट्रायलमध्ये 10 हजार लोकांची दोन वेळा टेस्ट करण्यात येईल. पहिल्यावेळी गोल्ड स्टँडर्ड मॉलिक्युलर आरटी-पीसीआर टेस्ट केली जाईल. त्यानंतर इस्त्रायल संशोधक टेस्टची तपासणी करतील. याशिवाय स्वॅब सॅम्पल संग्रह तंत्रापेक्षा वेगळ्या अशा या टेस्टमध्ये लोकांना श्वासनलिकासारख्या उपकरणाला झटका देणे किंवा बोलावे लागेल, ज्यामुळे टेस्टसाठी नमूणे मिळवण्यासाठी मदत होईल.

संशोधकांचे म्हणणे आहे की, जर ही ट्रायल यशस्वी झाली तर लोकांना अवघ्या 30 सेकंदात कोरोना तपासणीचा रिपोर्ट मिळेल तसेच तंत्रज्ञान व्यवसायांसाठी सुरक्षित मार्ग प्रशस्त होऊ शकतो. या तंत्रज्ञानाच्या यशस्वी परीक्षणानंतर जोपर्यंत वॅक्सीन विकसित होणार नाही तोपर्यंत लोक कोरोना व्हायरससोबत जगण्यास सक्षम होऊ शकतील. आरएमएल हॉस्पिटलमध्ये याची ट्रायल सुरू झाली आहे. अपेक्षा आहे की, येत्या काही दिवसात याचे परिणाम येऊ शकतात.

विशेष विमानाने अनेक अद्ययावत व्हेंटिलेटर सुद्धा सोमवारी भारतात पोहचले आहेत. या अभियानाला ऑपरेशन ब्रिथिंग स्पेस नाव देण्यात आले आहे. इस्त्रायल परराष्ट्र मंत्रलयात आशिया आणि पॅसिफिकचे उप महासंचालक गिलेड कोहेन यांनी द टाइम्स ऑफ इस्त्रायलमध्ये प्रकाशित एका लेखात म्हटले आहे की, इस्त्रायलने या व्हेंटिलेटरच्या निर्यातीसाठी आणि मंजूरीसाठी विशेष प्रयत्न केले. दोन्ही देश व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भारतातील इस्त्रायलचे राजदूत रोन मलका यांनी म्हटले की, जर तपासणी किट विकसित झाले तर हे काही सेकंदात रिपोर्ट देईल आणि कोविड-19 च्या विरोधातील लढाईत महत्वपूर्ण भूमिका निभावेल.

डीआरडीओसह काम करत आहेत इस्त्रायली संशोधक
इस्त्रायली दूतावासाने मागच्या आठवड्यात म्हटले होते की, इस्त्रायली संरक्षण मंत्रालयाची संशोधन आणि विकास टीम कोविड-19 रॅपिड तपासणी किट विकसित करण्यासाठी भारताचे मुख्य शास्त्रज्ञ के. विजय राघवन आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे (डीआरडीओ) सोबत मिळून काम करत आहेत. याचे तपासणी परिणाम 30 सेकंदापेक्षा कमी वेळात येऊ शकतात. इस्त्रायलच्या संरक्षण मंत्रालयात डायरेक्टरेट आफ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट (डीडीआर अँड डी) ची टीम आपल्या भारतीय समकक्षांसह मिळून अनेक रॅपिड तपासणीसाठी अंतिम टप्प्यातील परीक्षण करतील.