‘ISRO’ जानेवारीमध्ये ‘लॉन्च’ करणार आतापर्यंतचा सर्वात ‘शक्तीशाली’ संचार ‘उपग्रह’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – भारतीय अवकाश संशोधन संस्था पुढील वर्षी जानेवारीमध्ये आपला नवा संचार उपग्रह लॉन्च करणार आहे. हा उपग्रह लॉन्च झाल्यानंतर देशातील संचार व्यवस्था आणखी मजबूत होईल. यामुळे देशात नवी इंटरनेट टेक्नॉलॉजी आणता येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसेच संपूर्ण देशात मोबाइल नेटवर्क पसरेल जेथे अजूनही मोबाइल सेवा उपलब्ध नाही.

काय आहे GSAT-30 –
हा जीसॅट सीरीजमधील अत्यंत शक्तीशाली संचार उपग्रह आहे ज्याच्या मदतीने देशातील संचार प्रणालीमध्ये आणखी लाभ होईल. सध्या जीसॅट सीरीजचे 14 उपग्रह काम करत आहे. त्यावर देशातील संचार व्यवस्था आधारित आहे.

कसे काम करेल GSAT-30 ? –
जीसॅट – 30 च्या मदतीने देशातील संचार प्रणाली, टेलिव्हिजन प्रसारण, सेटेलाइटच्या मदतीने समाचार प्रबंधन, समाजासाठी उपयोगी येतील अशी जियोस्पेशल सुविधा, हवामानासंबंधित माहिती, आपत्तीच्या पूर्व सूचना आणि शोध, रेक्स्यू ऑपरेशन यात फायदा होईल.

केव्हा पर्यंत काम करेल GSAT-30?
हे लॉन्च झाल्यानंतर 15 वर्षांपर्यंत पृथ्वीच्या वर भारतासाठी काम करेल. याला जियो इलिप्टिकल ऑर्बिटने स्थापित करण्यात येईल. यात दोन सोलर पॅनल असतील आणि बॅटरी असेल जी त्याला ऊर्ज प्रदान करेल.

केव्हा आणि कुठून लॉन्च होणार GSAT-30? –
इसरोचे GSAT-30 यूरोपियन हैवी रॉकेट एरियन-5ECA ने जानेवारी महिन्यात सोडण्यात येईल. GSAT-30 चे वजन 3100 किलोग्रॅम आहे. हे इनसॅट सॅटेलाइटच्या जागी काम करेल. हे सॅटेलाइट यूरोपात पोहचले आहे. हे फ्रेंच गुएनाहून लॉन्च करण्यात येईल.

Visit : policenama.com