नगर ‘IT हब’साठी प्रयत्न करा : रिलायन्स होम फायनान्स कंपनीचे मुख्य अधिकारी प्रशांत उतरेजा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील महाराष्ट्र राज्य हे सर्वात रोजगार देणारे राज्य आहे. या राज्याची संस्कृती सर्वाना बरोबर घेऊन चालणारी संस्कृती आहे. इतर राज्यातील लोकांनी महाराष्ट्रात येऊन आपले उद्योग, धंदे व रोजगार मिळवला. सर्वाना महाराष्ट्र हे राज्य हवेहवेसे वाटणारे राज्य आहे. आ. संग्राम जगताप या युवकाच्या माध्यमातुन शहरामध्ये आय. टी. पार्कच्या रूपाने अनेक तरूणांना रोजगार मिळणार आहे.

तसेच आय. टी. पार्कच्या माध्यमातुन बुध्दीमत्तेचे शहर म्हणुन नगर शहराची ओळख होईल. येत्या तीन ते चार वर्षामध्ये सर्वानी आ. संग्राम जगताप यांच्याबरोबर राहुन देशात नगर हे आय. टी. हब होण्यासाठी प्रयत्न करावे. रिलायन्स कंपनीच्या माध्यमातुन या ठिकाणी उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील राहिल. असे प्रतिपादन रिलायन्स होम फायनान्स कंपनीचे मुख्य अधिकारी प्रशांत उतरेजा यांनी केले.

आ. संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या आय. टी. पार्कचे उदघाटन रिलायन्स कंपनीचे प्रशांत उतरेजा यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आ. अरूण जगताप, एल. अँड. टी. कंपनीचे अरविंद पारगांवकर, महावितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता एस. के. सांगळे, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, ‘आमी’चे राजेंद्र कटारिया, सिव्हील डेप्युटी इंजिनिअर गणेश वाघ, कारभारी भिंगारे, अशोक सोनवणे, सुनिल मुनोत, हरिश तावरे, सुमित लोढा, सागर निंबाळकर, चक्रवती बिर्जी, राजेश पुरूषोत्तम, गौरव नय्यर, शशी घिगे, राजेंद्र आठरे, रेश्मा आठरे , एम. एस. ई. बी. चे श्री. महाजन आणि नगरसवेक व शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी आ. संग्राम जगताप म्हणाले की, नगरच्या तरूण पिढीसाठी काहीतरी केले पाहिजे यासाठी गेल्या तीन वर्षापासून वारंवार एम. आय. डी. सी. च्या कार्यालयाशी आय. टी. पार्क सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला. तसेच नगर शहरात कंपन्या येण्यासाठी हैद्राबाद, बँगलोर, पुणे, अहमदाबाद, मुंबई, दिल्ली या ठिकाणी जावुन मिटींग घेतल्या. उद्योजकांना नगर मध्ये येण्यासाठी प्रोत्साहित केले. निवडणूका येत असतात जात असतात पण राजकारणाच्या पलीकडे जावुन नगरकरांसाठी काहीतरी करण्याचे स्वप्न बाळगले. सरकार कोणाचेही असो, इच्छाशक्तीच्या जोरावर शासनाकडुन मोठा निधी उपलब्ध करू शकलो.

नगर शहराच्या विकासासाठी कुणी काय केले याकडे लक्ष न देता आपण काय करायचे या दृष्टीकोणातुन शहरातील जनतेला बरोबर घेऊन शहराच्या विकासाबरोबर शहरातील युवकाच्या रोजगाराचा प्रश्न आय.टी. पार्कच्या माध्यमातुन मार्गी लावले. येत्या जानेवारी पर्यत १००० तरूणांच्या हाताला रोजगार मिळेल. सर्वाच्या आशीर्वादाने नगर शहराची ओळख ही आय. टी. हब ने होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. प्रत्येकाने आपल्या शहराबद्दलची आस्था असली पाहिजे.

आपले शहराच्या ऐतिहासिक वारशाबरोबर संस्कृती व क्रिडा क्षेत्राकडे झेप घेईल असे काम आपल्याला करायचे आहे व ही संस्कृती व परंपरा जपायची आहे. शहराच्या विकासाकडे टप्प्याटप्याने वाटचाल करत आहे. सिना नदीच्या शुशोभीकरणासाठी मी २०१५ साली अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला, आता कुठे कामाला सुरूवात झाली आहे. भविष्यकाळात सिना नदी सुशोभिकरणाचा प्रकल्पही नगरकरांना पहायला मिळेल असे आ. संग्राम जगताप म्हणाले.

अरविंद पारगांवकर म्हणाले की, नगर शहराला एक तरूण आमदार लाभल्यामुळे आय.टी. पार्कच्या इमारतीला एक उजाळा मिळाला आहे. गेल्या २० वर्षापासून धुळघात पडलेली इमारत आज दिमाखदार पद्धतीने आपल्यासमोर उभी आहे. आ. संग्राम जगताप यांची जनतेत जावुन काम करण्याची पध्दती अनेक वर्षापासून मी पाहत आहे. आय. टी. पार्कच्या रूपाने नगर शहराची ओळख निर्माण होईल असे ते म्हणाले. यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, राजेंट कटारिया आदींची भाषणे झाली.

शशी घिगे यांनी प्रास्ताविकामध्ये आ. संग्राम जगताप यांनी आय. टी. पार्कसाठी खुप मेहनत घेऊन काम केल्यामुळे आज शहरातील तरूणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आय. टी. पार्क तर्फे ३५० पदाच्या जागेसाठी सुमारे ७५०० युवकांनी उमेदवारी अर्ज दाखल झाले व त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या याचा अर्थ सध्या बेरोजगारीचे प्रमाण खुपच आहे. यापुढेही आय. टी. पार्कच्या माध्यमातुन तरूणांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन गौरी जोशी यांनी केले, आभार प्रदर्शन गौरव नय्यर यांनी केले.

आरोग्यविषयक वृत्त –