शहर अध्यक्ष निवडीला उशीर झालाय, लवकरच जाहिर करू : अजित पवार 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपपदाच्या निवडीला उशीर झाला असून त्या बाबत सोमवारी नागपूर येथील अधिवेशाना दरम्यान चर्चा करून त्यांना शहर अध्यक्षाचे नाव लवकरच जाहीर करण्यास सांगणार असल्याची घोषणा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमा दरम्यान त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्ष बाबत अद्याप पर्यंत निर्णय घेतला गेला नाही. त्या प्रश्नावर अजित पवार यांनी भूमिका मांडली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्षा आणि खासदार वंदना चव्हाण यांनी गतवर्षी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी शहर अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठवला. त्यानंतर शहरपदासाठी अनेक जण इच्छुक होते. मात्र पक्षाने वंदना चव्हाण यांना कायम ठेवल्याने शहर अध्यक्षपदाच्या चर्चा थांबल्या.
[amazon_link asins=’B076BHMFHV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’20548694-812a-11e8-a2cf-bdff0d23d131′]

राज्यसभेच्या खासदारपदी वंदना चव्हाण यांची फेरनिवड झाल्याने पुणे शहर अध्यक्षपदाच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली असून यापदासाठी कोणाची वर्णी लागणार. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्याच दरम्यान झालेल्या हल्लाबोल आंदोलनाच्या बैठकी प्रसंगी पुणे शहराच्या अध्यक्षपदी लवकरच नव्या चेहऱ्याला संधी दिली जाईल. अशी घोषणा अजित पवार यांनी केल्याने शहर अध्यक्षपदाच्या चर्चेला उधाण आले होते.

या सर्व घडामोडी होत असताना. प्रदेश अध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मागील महिन्यात एकमुखाने पुण्यात करण्यात आली. त्याचवेळी पुणे शहर अध्यक्षपदाची घोषणा देखील होईल.असा अंदाज होता. मात्र त्यावेळी शहर अध्यक्षपदाची निवड झाली नसून पक्षाच्या वर्धापन दिनानंतर पुढील पंधरा दिवसाच्या आता शहर अध्यक्षाच्या नावाची घोषणा केली जाईल. असे अजित पवार यांनी पुण्यातील कार्यक्रमावेळी जाहीर केले होते. त्यामुळे अजित पवार कोणाच्या नावाची घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. शहर अध्यक्षपदासाठी माजी उपमहापौर दीपक मानकर यांचे नाव निश्चित मानले जात होते. मात्र त्यांच्ये एका गुन्ह्या प्रकरणी नाव पुढे आल्याने शहर अध्यक्षपदाच्या शर्यतीमधून त्यांचे नाव मागे पडले आणि माजी महापौर प्रशांत जगताप, माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. या दोघांपैकी पक्ष कोणाला संधी देते हे पाहणे जरुरीचे असताना. मागील आठवड्याभरापासून पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांचे नाव निश्चित मानले जात आहे. यावरून सोशल मीडियामध्ये  जोरदार चर्चा रंगल्याचे पाहाव्यास मिळत आहे.